शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, नवऱ्यासह कुटुंबाचाही आनंद गगनात मावेना, म्हणाली, “माझ्या घरी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 20, 2025 | 3:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ishita Dutta  And Vatsal Sheth Shared Goodnews

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, नवऱ्यासह कुटुंबाचाही आनंद गगनात मावेना, म्हणाली, "माझ्या घरी…"

Ishita Dutta  And Vatsal Sheth Shared Goodnews : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री इशिता दत्ता पुन्हा एकदा आई होणार आहे आणि या बातमीने तिचा पती वत्सलचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. बाळ होणार या गुडन्यूजने इशिता आणि वत्सल दोघेही खूप उत्साही आहेत. सन २०२३ मध्ये, इशिता आणि वत्सल सेठ हे त्यांचा मुलगा वायुचे पालक बनले आणि आता आणखी एका गरोदर राहिल्याने त्यांच्या घरात आनंद पसरला आहे. वत्सल सेठ नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वडील होण्याविषयी बोलला. पत्नी इशिताची ही दुसरी गर्भधारणा कशी आहे याबाबतही त्याने भाष्य केलं. अजय देवगणची ऑनस्क्रीन लेक म्हणून इशिताला ओळख मिळाली आहे. तर ‘टार्झन’ चित्रपटात अजयच्या मुलाची भूमिका साकारणारा वत्सल शेठ होता.

‘दृश्यम’ चित्रपटांमध्ये अजय देवगणच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता पुन्हा गरोदर आहे. वत्सल सेठ याने ‘हिंदुस्तान टाईम्स’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, हे माझ्यासाठी सरप्राईज होते आणि या सरप्राईजने मी खूप खूश आहे. जेव्हा इशिताने मला प्रेग्नेंसीबद्दल सांगितलं ‘Ohh Waah’ अशी माझी प्रतिक्रिया होती. मला काहीच कळत नव्हतं. बाबा म्हणून माझ्यासाठी ही खूप मोठी बातमी होती, त्यामुळे मला खूप आनंद झाला. इशिता आमच्या खोलीत आली आणि तिने मला ही बातमी दिली होती. मला आठवतंय इशिताने त्या दिवसांमध्ये सांगितलं, जेव्हा वायू खूप चिडचिड करायचा. आमच्या कुटुंबात नवीन सदस्य जुलैमध्ये येणार आहे. आम्ही लोकांना याबद्दल सांगण्यापूर्वी थोडा वेळ घेतला. आम्ही यावर चर्चा केली, कारण दुसरी गर्भधारणा निश्चितपणे पहिल्यापेक्षा खूप वेगळी असते,” असंही तो म्हणाला.

आणखी वाचा – Video : वडिलांचा ९३वा वाढदिवस, खास सेलिब्रेशन अन्…; आदेश बांदेकर यांच्या वडिलांचे प्रेम पाहून नेटकरीही भारावले

View this post on Instagram

A post shared by Vatsal Sheth (@vatsalsheth)

ई-टाइम्सशी बोलताना इशिता म्हणाली, “यावेळी आम्ही जास्त आनंदी आणि उत्साही आहोत. वायूसोबत प्रत्येक अनुभव नवीन होता. मला आठवतं की मी अनेकदा डॉक्टरांकडे जायचे, पण यावेळी माझ्या डॉक्टरांना मी जास्त वेळा फोन करत नाही याचं मलाच आश्चर्य वाटतंय. माझे आईवडील आमच्याबरोबर राहायला आले आहेत, त्यामुळे माझ्या घरी चांगली सपोर्ट सिस्टीम आहे”.

आणखी वाचा – रिचा चड्डा व अली फजलने ठेवलं लेकीचं नाव, अर्थ आहे फारच वेगळा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

इशिता दत्तने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिच्या दुसर्‍या गर्भधारणेचे संकेत दिले. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर करत याबाबतची अपडेट दिली. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०१७ साली लग्नगाठ बांधली. लग्नानंतर सहा वर्षांनी त्यांनी पहिल्या बाळाचं स्वागत केलं आणि आता इशिता लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे.

Tags: entertainment newsIshita Dutta  And Vatsal ShethIshita Dutta  And Vatsal Sheth Shared Goodnews
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Hina Khan On Cancer

"काहीतरी गंभीर आहे पण…", सुरुवातीच्या काळात कर्करोगाच्या लक्षणांकडे हिना खानने केलं होतं दुर्लक्ष, खुलासा करत म्हणाली, "शूटिंग सोडून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.