शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरामध्ये तुम्ही ‘या’ पाच गोष्टी करत असाल तर कधीच होणार नाही पैशांची भरभराट, वेळीच टाळा अन्यथा आर्थिक नुकसान वाढणार

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 14, 2024 | 4:30 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Vastushastra making these five habits can bring happiness to your home see the details

घरामध्ये तुम्ही 'या' पाच गोष्टी करत असाल तर कधीच होणार नाही पैशांची भरभराट, वेळीच टाळा अन्यथा आर्थिक नुकसान वाढणार

वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. त्यामुळे जर तुम्ही काही गोष्टी तुमच्या घरात ठेवल्या तर त्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्याचप्रमाणे तुमच्या काही चांगल्या-वाईट सवयींचा तुमच्या ऊर्जेवर परिणाम होतो. तुमची आर्थिक प्रगती विशेषतः या गोष्टींशी जोडलेली आहे. वास्तुशास्त्रात घराशी संबंधित काही अशा सवयी सांगितल्या आहेत, ज्यांचा थेट संबंध तुमच्या उत्पन्नाशी आहे. चला, जाणून घेऊया या सवयी कोणत्या आहेत याबद्दल…

न वापरलेली भांडी जास्त वेळ स्वयंपाकघरात ठेवू नयेत. ही भांडी खाल्ल्यानंतर लगेच धुवून पुन्हा त्यांच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करा. रात्रीची भांडी सकाळी धुण्याची अनेकांना सवय असते, पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे तुम्ही स्वयंपाकघरात कधीही उष्टी भांडी ठेवू नये. यामुळे राहू-केतूचा अशुभ प्रभावही तुमच्यावर पडतो.

तुम्ही झोपत असलेल्या पलंग कधीही घाण ठेवू नका. फाटलेल्या किंवा घाणेरड्या बेडशीटमुळे तुमच्या नशिबावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. सकाळी उठल्याबरोबर अंथरुण स्वच्छ करा आणि चादर व्यवस्थित पसरवा. एकच चादर अनेक दिवस बेडवर ठेवू नका. गलिच्छ बेडशीट्स तुमच्या घरात गरिबी आणतात.

आणखी वाचा – ओटीटीवरील अश्लील कंटेटविरोधात कठोर कारवाई, सरकारकडून ‘या’ साईट्स अन् ॲप्सवर बंदी, जाणून घ्या…

अन्न खाल्ल्यानंतर त्याच भांड्यांमध्ये हात धुवू नका. जेवण झाल्यानंतर लगेच भांडी स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात धुवा. भांड्यात हात धुतल्याने तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होते. यामुळे तुमचे आरोग्यही बिघडू शकते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरात समृद्धी हवी असेल तर ही सवय सोडणे खूपच गरजेचे आहे.

दररोज पूजा केल्यानंतर, मंदिर परिसराची स्वच्छता ठेवा. यामुळे तुमच्या घरात प्रगती होते आणि देवी लक्ष्मीची कृपाही तुमच्यावर राहते. रोज पूजा करत नसलात तरी घरातील मंदिरात कधीही धूळ किंवा अस्वच्छता ठेवू नका. यामुळे तुमच्या घरात नकारात्मकता राहते आणि यामुळे मानसिक तणावही राहतो.

आणखी वाचा – …अन् देवाने पुन्हा एकदा जीवदान दिलं, विद्याधर जोशींचं फुफ्फुसच ८३ टक्के निकामी, मरणाच्या दारात पोहोचले आणि…; सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

याचबरोबर अनेकांना घरात शूज (चप्पल) इकडे तिकडे फेकण्याची सवय असते. शूज फेकण्याची ही सवय तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा आणू शकते. विशेषत: शूज कधीही मुख्य दरवाजाजवळ ठेवू नका, यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होण्यास अडथळा निर्माण होतो. शूज नेहमी रॅकमध्ये किंवा वेगळ्या कपाटात ठेवावेत.

Tags: वास्तूशास्त्रवास्तूशास्त्र मराठी बातमीवास्तूशास्त्र बातमीVastushastraVastushastra Marathi NewsVastushastra NewsVastushastra Tips
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Ranbir Kapoor girlfriends

एकाचवेळी अनेक मुलींना डेट करायचा रणबीर कपूर, दीपिका पदुकोणलाही फसवलं, रंगेहाथ पडकलं होतं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.