गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘असे क्षण पुन्हा पुन्हा यावेत…’ हास्यजत्रेच्या अमेरिकेतील प्रयोगानंतर वनिता झाली भावुक

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 24, 2023 | 12:52 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
vanita kharat in hasyajatra usa tour

vanita kharat in mhj usa tour

आयुष्यात कितीही टेन्शन्स असो, त्यावर एकच उपाय असतो तो म्हणजे मनसोक्त हसण्याचा. आणि हेच काम करत आहे ते छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. गेली अनेक वर्ष हास्यजत्रा प्रेक्षकांना मनमुरादपणे हसवत आहे. याचं कारण, म्हणजे धम्माल विनोदी स्किट्स, कलाकारांचे अचूक टायमिंग, स्किट्सचे अप्रतिम सादरीकरण आणि कलाकार व पडद्यामागील कलाकारांची मेहनत. यांमुळेच आज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असून शोमधील कलाकारांचे जगभरात चाहते आहेत. (Maharashtrachi Hasyajatra USA Tour)

सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अमेरिकेच्या दौऱ्यावर असून हास्यजत्रेचे अवघे काही शोज उरले आहेत. गेल्या महिन्याभरापासून शोमधील कलाकार तिथल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून आतापर्यंत झालेले सर्वच शोज हाऊसफुल्ल झालेत. शोला अमेरिकेत मिळालेल्या तुफान प्रतिसादाबद्दल हास्यजत्रेतील कलाकार वनिता खरात हिने प्रेक्षकांचे आभार मानले असून तिने इंस्टाग्राम रील पोस्ट करत आपली भावना व्यक्त केली. (vanita kharat in mhj usa tour)

पाहा काय म्हणाली वनिता खरात (vanita kharat in mhj usa tour)

वनिताने एक रील पोस्ट केला आहे, ज्यात वनिता व हास्यजत्रेतील अन्य कलाकार टोरँटो येथील शोदरम्यान सुरु असलेली तयारी, स्किट्समधील काही क्षण व शोनंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद दिसत आहे. वनिताने ही रील पोस्ट करताना लिहिलंय, “Toronto तुम्ही खूप प्रेम दिलं! अशा theatre ला परफॉर्म करता येणं, ते ही हाऊसफुल्ल शो ला! एका कलाकाराला या पेक्षा मोठी गोष्ट ती काय! अविस्मरणीय प्रयोग. असे क्षण पुन्हा पुन्हा यावेत हिच रंग देवते चरणी प्रार्थना.

हे शक्य झालं ते फक्त @sonymarathi @amitphalke @5dimensionsent #अजयभाळवणकर @sachin_p_goswami @sachinmote73 Thank you so much sir इथपर्यंत पोहोचवण्यासाठी ❤️’ असं म्हणत वनिताने दिग्दर्शक, अन्य टीम व प्रेक्षकांचे आभार मानले. तिच्या या पोस्टवर शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी कमेंट करत म्हटलंय, “Proud of you team MHJ”. तर शोमधील अन्य कलाकारांबरोबरच मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार व चाहत्यांनी तिच्या या पोस्टला भरभरून प्रेम दिलंय. (Maharashtrachi Hasyajatra)

हे देखील वाचा : साखरपुडा उरकताच स्वानंदीने लग्नाबद्दल केला खुलासा

Tags: hasya jatra in usamaharashtrachi hasyajatramhjvanita kharat
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
sukanya mone about baipan bhari deva

'हैराण केलंय बायकांनी'...राजस्थान मध्ये १५० बायकांनी भांडण करत केली 'बाईपणच्या' शोची मागणी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.