‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘सैराट’ आणि ‘वेड’ नंतर ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा जो उस्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे, ते पाहून सर्वच भारावून गेले आहेत.चौथ्या आठवड्यात ही चित्रपटाप्रती तोच उत्साह प्रेक्षक आणि कलाकारांमध्ये पाहायला मिळतो आहे.चांगल्या कलाकारांची भट्टी जमली की एक उत्तम चित्रपट जन्माला येतो. त्याचं ताज उदाहरण म्हणजे बाईपण भारी देवा हा चित्रपट आहे. (sukanya mone about baipan bhari deva )
चित्रपटाने जे यश सपांदन केलं आहे, त्यानिमित्त नुकतीच एक Success Party पार पडली. या पार्टीचे अनेक फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना पाहायला मिळाले, चित्रपटात आपल्या कलेला दाबून ठेवणाऱ्या साधनाचे म्हणजे अभिनेत्री सुकन्या मोनेंच्या पडद्यामागच्या डान्सचं मात्र प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं.तसेच अनेक किस्से देखील कलाकारांनी सांगितले,तेव्हा सुकन्या मोनेंनी राजस्थान मधला एक किस्सा सांगितला आहे.
पाहा काय आहे किस्सा? (sukanya mone about baipan bhari deva)
त्या म्हणाल्या “राजस्थान कोटा येथून मला एका बाईचा ई-मेल आला होता. त्या पेशाने वकील होत्या. त्यांनी भांडण करून राजस्थानमध्ये चित्रपटाचा शो ठेवला होता. त्यांच्याकडे अजिबात मराठी चित्रपटांचे स्क्रिनिंग केले जात नाही. पहिल्यांदाच त्या बाईंच्या विनंतीला मान देऊन “बाईपण…”चा शो तेथे लावण्यात आला होता. त्या एकूण १५० बायकांनी अक्षरश: भांडण करून स्पेशल शोची मागणी केली होती.”त्या बाईंची एकच मागणी होती की, आम्ही १५० बायका चित्रपट पाहायला जात आहोत आणि आमच्याकडे तुमचे पोस्टर नाही. पोस्टर काही करून पाठवा कारण, आम्हाला फोटो काढायचे आहेत. आमच्या मार्केटिंग टीमने त्या बायकांसाठी पोस्टरची व्यवस्था केली आणि त्यांनी पोस्टरजवळ उभं राहून फोटो काढले, व्हिडीओ केले ते सगळे आम्हाला पाठवले. ही, आमच्या पोस्टरची कमाल आहे. (sukanya mone about baipan bhari deva)
दुसरा किस्सा सांगताना सुकन्या मोने म्हणाल्या, “आम्ही सगळेजण पुण्यातील एका चित्रपटगृहात गेलो होतो. तेथील क्लर्कने मला सांगितलं हैराण केलंय बायकांनी…आजपर्यंत कोणत्याच चित्रपटाच्या पोस्टरजवळ उभं राहून एवढे फोटो कोणीही काढले नव्हते. आतापर्यंत जवळपास १५ हजार बायकांनी या पोस्टरबरोबर फोटो काढलेत.”
हे देखील वाचा : ज्येष्ठ नाट्य व सिने अभिनेते जयंत सावरकर यांचं वृद्धापकाळाने निधन