बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नटून थटून आले पण…”, नाट्यसंमेलनाचा पत्ता सापडला नाही म्हणून वंदना गुप्ते यांचा संताप, म्हणाल्या, “मी आता परत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 8, 2024 | 1:21 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vandana Gupte On Natyasanmelan

"नटून थटून आले पण...", नाट्यसंमेलनाचा पत्ता सापडला नाही म्हणून वंदना गुप्ते यांचा संताप, म्हणाल्या, "मी आता परत..."

१०० वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दणक्यात सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. पुणे येथे सुरु झालेलं हे नाट्यसंमेलन पुढे पिंपरी चिंचवड, अहमदनगर, सोलापूर, बीड, नागपूर, लातूर, मुंबई व शेवटी रत्नागिरी अशा ठिकठिकाणी भरणार आहे. या नाट्य संमेलनादरम्यान विविधांगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक कलाकार मंडळी या नाट्य संमेलनात सहभागी झालेलेही पाहायला मिळत आहेत. पारंपरिक अंदाजात आलेले हे कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरून अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहेत. (Vandana Gupte On Natyasanmelan)

अशातच एका नाट्य संमेलनाला घेऊन एका मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आला आहे. अभिनेत्री वंदना गुप्तेदेखील यानाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या. मात्र त्यांना ठिकाणाचा पत्ता न मिळाल्याने त्या नाराज झाल्या आणि पुन्हा मुंबईला परतल्या. नाट्यसंमेलनाचा पत्ता न सापडल्याने वंदना गुप्ते नाराज झाल्या आहेत. यामुळे त्यांना आल्या पावली मुंबईला परत जावं लागलं असल्याचं या व्हिडीओमधून समोर आलं आहे. सकाळ मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मात्र नेटकऱ्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “तो शेवटचा दिवस…”, ‘बिग बॉस मराठी’च्या ‘त्या’ दिवसांमध्ये रमला अक्षय केळकर, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “अजूनही घरात…”

या व्हिडीओद्वारे वंदना गुप्ते म्हणत आहेत की, “ओके दादा मी परत मुंबईला चालली आहे. नुसतीच गोल गोल फिरत आहे. मला एकही, कुठलाही सभामंडप दिसलं नाही, सापडलं नाही. रामकृष्ण मोरे सभागृह माहिती आहे म्हणून. पण मला काही आता इकडे तिकडे कुठे जायचं नाही. मी आले होते नटून थटून पण मला काही कार्यक्रमाला वेळेत पोहोचता आलं नाही तर मी जाते आता परत” असं म्हणत नाट्यसंमेलनाचा पत्ता न सापडल्याचं त्यांनी व्हिडीओमधून सांगितलं आहे.

आणखी वाचा – Video : आमिर खानने लेकीच्या लग्नासाठी बूक केलेलं उदयपूरमधील पॅलेस आहे इतकं भव्यदिव्य, वऱ्हाडी बोटीने पोहोचले अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘सकाळ मीडिया’ने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत, “अंगणवाडीचा पोरगा सुद्धा गुगल मॅप वापरून योग्य जागेवर पोहोचतो” असं म्हटलं आहे. तर आणखी एका युजरने, “आमच्या एरियामध्ये होत आहे हा कार्यक्रम. अगदी सोप्पा पत्ता आहे. बाकी कलाकारांना कसा काय सापडला मग? ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाल्या की रामकृष्ण मोरे सभागृह माहिती आहे. तर तिथे आल्यावर नियोजकाना का फोन केला नाही?” अशी कमेंट करत त्यांना प्रश्न विचारला आहे.

Tags: marathi actressmarathi malikavandana guptevandana gupte on natyasanmelanvandana gupte troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Bela Shinde On Kedar Shinde

"काही ठाऊक नसताना माझ्या आयुष्यात…", 'त्या' प्रसंगानंतर केदार शिंदेंसाठी बायकोची भावुक पोस्ट, म्हणाल्या, "डोळे पाणावले अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.