कलाक्षेत्रामध्ये कोणीही गॉडफादर नसताना स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणं म्हणजे तारेवरची कसरत. कित्येक कलाकारांनी स्वबळावर मेहनत करत बॉलिवूमध्ये नाव कमावलं. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे वाणी कपूर. वाणीने बॉलिवूडच्या बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकरल्या. ‘वॉर’ चित्रपटामधील तर वाणीची भूमिका प्रचंड गाजली. पण कलाक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं तिच्यासाठी काही सोप नव्हतं. यासाठी तिला बऱ्याच कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. त्वेचेच्या रंगावरुनही वाणीला हिणवण्यात आलं. याचबाबत तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. तिच्या वाईट अनुभवांबाबत वाणीने खुलासे केले आहेत. (Vaani Kapoor talk about Bollywood)
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वाणीने तिच्या लूकवरुन अनेकांनी तिला हिणवलं असल्याचं सांगितलं. तसेच अभिनेत्री रंगाने गोरीच हवी म्हणूनही बोललं गेलं. मात्र या सगळ्या नकारात्मक गोष्टींकडे तिने दुर्लक्ष केलं. आपलं काम कसं उत्तम होईल याकडे वाणीने लक्ष दिलं. अभिनयामधून प्रत्येकाला उत्तर दिलं पाहिजे हे तिने मनाशी ठाम केलं होतं. म्हणूनच ती आज एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आणखी वाचा – ‘शिवा’ मालिका बंद होणार?, पूर्वा कौशिकच्या ‘त्या’ इंस्टाग्राम स्टोरीने चर्चांना उधाण, प्रेक्षकांचीही नाराजी
वाणी म्हणाली, “मला कधीच कोणी तोंडावर काही बोललं नाही. पण काही जवळचे लोक मला सांगायचे त्यावरुन प्रत्येक गोष्टी मला कळत गेल्या. मी इतकी गोरी नाही म्हणून भूमिकाच मिळणार नाहीत असं मला एकदा एका निर्मात्याने सांगितलं होतं. माझ्या चेहऱ्याचा रंग अगदी दूधासारखा नाही म्हणून मला नाकारण्यात आलं होतं”.
पुढे ती म्हणाली, “जे आहे ते आहे हे मी स्वतःला आधी पटवून दिलं. रंग गोराच हवा असेल तर त्या प्रोजेक्टमध्ये मी कामच करणार नाही. तुम्हाला तुमच्या चित्रपटासाठी दूधासारख्या गोऱ्या रंगाची अभिनेत्री हवी असेल तर तुम्ही शोधा. कारण त्यांनाही तेच हवं होतं. मी माझ्यासाठी एक उत्तम निर्माता शोधण्यास सक्षम होते. पण ही गोष्ट खूप आधीची आहे. मी नेहमीच माझ्याविषयी हेच ऐकते की, तू खूप बारीक आहेस. थोडं वजन वाढवलं पाहिजे. कारण अंगाने असलेल्या महिला अनेकांना आवडतात. पण मी जशी आहे तशीच मला आवडते. मला माझ्यामध्ये कोणतेच बदल नकोत”.





