लठ्ठपणा ही अगदी सामान्य तक्रार झाली आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मात्र बऱ्याचजणांसाठी ही एक मोठी समस्या आहे. असे बरेच लोक आहेत जे लठ्ठपणामुळे त्रासलेले आहेत आणि यावर उपाय म्हणून जिममध्ये जात आहेत. तर असे बरेच लोक आहेत ज्यांना कामाच्या व्यस्त श्येड्युलमुळे जिममध्ये जाता येत नाही. प्रत्येकासाठी वजन कमी करणे कठीण आहे. आपली जीवनशैली हे लठ्ठपणाचे मुख्य कारण आहे. आपलं राहणीमान व खानपानात झालेल्या बदलामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं आहे. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगच्या अहवालानुसार, लठ्ठपणा कमी करण्याचा प्रयत्न करताना, सर्वप्रथम तुम्ही लठ्ठपणाच्या मुळाकडे लक्ष दिले पाहिजे. खाण्याच्या चांगल्या सवयींबरोबरच अशा गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे चरबी कमी होऊन नवीन फॅट तयार होणे बंद होईल. (Weight Loss Tips)
मेयो क्लिनिकच्या मते, दररोज कोमट पाण्याबरोबर एपल साइडर विनेगरचे सेवन केल्यास तुमचा लठ्ठपणा त्याच्या मुळापासून दूर होण्यास मदत होते. याचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे, यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणातही राहते. ऍपल सायडर व्हिनेगर पिण्याची उत्तम वेळ म्हणजे रिकामी पोट. त्यामुळे याचे सेवन सकाळी नाश्त्यापूर्वी करावे. एक ग्लास पाण्यात एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर व मध मिसळून ते प्या, याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी घरगुती उपायांपैकी मध व लिंबाचे सेवन करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. मधामध्ये असे अनेक गुणधर्म असतात, जे कोलेस्ट्रॉल न वाढवता वजन कमी करतात. या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी सकाळी उठून एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून प्यावे.


वाढत्या वजनाचा त्रास असलेल्या लोकांसाठी एका जातीची बडीशेप खाणे खूप फायदेशीर ठरु शकते. बडीशेपमध्ये फायबरच प्रमाण अधिक असत, यामुळे तुमची भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. बडीशेपमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्मदेखील असतात. याचे सेवन करण्यासाठी एक ग्लास पाण्यात दोन चमचे बडीशेप घाला आणि रात्रभर भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या याने तुम्हाला नक्की फरक जाणवेल. रोजच्या जेवणात कढीपत्ताचा वापर अधिक करा यामुळे तुमचे वजन व कोलेस्ट्रॉल दोन्ही नियंत्रणात राहते. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी याचे सेवन केले जाऊ शकते. तसेच अन्न पचण्यासही याची मदत होते. रोज सकाळी रिकाम्या पोटी आठ ते दहा कढीपत्त्याचे सेवन करा.
(टिप : वर नमुद केलेले उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या.)