आपल्या विचित्र फॅशनसाठी ओळखली जाणारी ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद सतत चर्चेत असते. ती जितकी तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते, तितकीच ती तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात अडकली आहे. उर्फी जावेद तिचे कपडे स्वतःच डिझाईन करते, शिवाय ती तिच्या लूक्सवरही अनेक प्रयोग करत असते. एरव्ही सतत चर्चेत राहणारी उर्फी जावेद खाजगी आयुष्याबद्दल जास्त बोलणे तालात असून बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्रीचे कोणासोबत नाव जोडले नाही. मात्र, आता उर्फी जावेदचा एक नवा फोटो समोर आला असून या फोटोमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. (urfi javed dating rumours)
उर्फी जावेदने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिने एका मैत्रिणीला किस केला आहे. उर्फीच्या या फोटोनंतर तिच्या डेटिंगची चर्चा सुरु झाली आहे.
पिंकविलाच्या माहितीनुसार, उर्फी आणि तिची मैत्रीण काजोल यांच्यात मैत्रीपेक्षा जास्त घट्ट नातं आहे. शिवाय या दोघींनी अनेकदा एकत्र लंच व डिनरसुद्धा केलं असून ते प्रत्येक वीकेंड एकत्र घालवतात. सध्यातरी, यावर उर्फी व तिच्या मैत्रिणीने आपल्या नात्याबाबत अधिकृत घोषणा केली नसून दोघींनी यावर अधिक बोलणे टाळलं आहे.
हे देखील वाचा – Video : “दारूच्या नशेमध्ये बुडाली आहे”, अजय देवगणच्या लेकीचा पार्टीनंतरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “ही नशा…”

दोघींच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, उर्फी जावेद काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी 2’ मध्ये दिसली होती. शिवाय तिने काही मालिकांमध्ये कामदेखील केलं आहे. तर तिची मैत्रीण काजोलसुद्धा मॉडेल, अभिनेत्री असून ती पंचबीट सारख्या शोजमध्ये दिसली आहे. (urfi javed dating rumours)