नेहमीच्या वापरातील वस्तू खरेदी करणं असो वा पैशांसंबंधितील व्यवहार करण्यास UPI चा अधिकाधिक वापर केला जातो. अलिकडे बाजारातील भाजी विकणारी व्यक्तीही UPI पेमेंट तुम्ही करु शकता असं सहज बोलून जाते. पण आता तिच सेवा ठप्प झाली आहे. एकाच महिन्यात तिसऱ्यांदा UPI सेवा ठप्प झाली आहे. १२.५० वाजता साधारणतः UPIशी संबंधित २२०० तक्रारी समोर आल्या. Phonepay, gpay, paytmच नव्हे तर बँकांद्वारे पुरवण्यात आलेले UPI सर्विसही ठप्प झाली असल्याची तक्रार ग्राहकांकडून आली आहे. पण ही सेवा जर ठप्प होत असल्यास तुम्ही इतर पद्धतींचाही वापर करु शकता. त्या पद्धती नेमक्या कोणत्या? हे आपण जाणून घेऊया. (UPI service down in india)
UPI सेवा ठप्प झाल्यास काय कराल?
साधारणतः पेमेंट करण्यासाठी phonepay, paytm चा वापर होतो. तुम्ही जर phonepay, paytm चा वापर करत असाल आणि UPI मुळे पेमेंट होत नसेल तर वॉलेट फिचरचा वापर करु शकता. phonepay, paytm मध्ये वॉलेट फिचर असतं. तुम्ही त्याद्वारे पमेंट करु शकता. UPI ठप्प असेल तरच या वॉलेट फिचरचा वापर करा. अन्यथा इतरवेळी याचा वापर करणं कटाक्षाने टाळा.
आणखी वाचा – “थांब म्हटलं की थांबायचं…”, ‘पी.एस.आय.अर्जुन’चा टिझर प्रदर्शित, अंकुश चौधरीच्या लूकची सोशल मीडियावर हवा
दुसरा उत्तम पर्याय कोणता?
UPI शी संबंधीत ॲपचा तुम्ही वापर करणं तुम्ही टाळत असाल तर नेट बँकिंग तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. तुमच्या बँक ॲपच्या आधारे तुम्ही समोरच्या व्यक्तीला बँक टू बँक पेमेंट करु शकता. नेट बँकिंगला तुमचं अकाऊंट लिंक करुन ठेवल्यास व्यवहार करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. या पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवण्याचा मार्गही सुखकर होईल.
Whatsapp चाही पर्याय
अजूनही भारतात पेमेंट करण्यासाठी Whatsapp चा वापर केला जात नाही. पेमेंटचं फिचर Whatsapp लाही उपलब्ध आहे. Whatsapp वरही UPI द्वारेच पमेंट केलं जातं. पण जेव्हा UPI ची सेवा सुरळीत नसते तेव्हा Whatsapp पेमेंटवर ते थोड्याफार प्रमाणात योग्य पद्धतीने काम करतं.
आणखी वाचा – Ghibli ट्रेंड नक्की कसा सुरु झाला?, या कंपनीचा मालक कोण?, एकूण कमाई आहे तब्बल…
Debit किंवा Credit कार्डचा वापर
तुम्ही एखादी ठिकाणी शॉपिंगसाठी, गाडीमध्ये पेट्रोल भरण्यास जात असाल तर डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करा. सॅमसंग मोबाईलमध्ये सॅमसंग वॉलेट फिचर आहे. याद्वारेही तुम्ही विविध ठिकाणी गरजेनुसार पेमेंट करु शकता. UPI सेवा विस्कळीत असल्यास वरील दिलेल्या पद्धतींनुसार तुम्ही प्रत्येक अडथळा दूर करु शकता.