नात्यांच्या जगात अतिशय प्रेमळ आणि जिव्हाळ्याचं नातं असत ते बाप लेकीचं. एखादया मुलीच्या तिच्या वडिलांसाठी असलेलं प्रेम, आदर या भावना इतर नात्यांपेक्षा नेहमीच वेगळ्या ठरतात. मुलीच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर सावली सारखा उभा राहणाऱ्या बाप नावाचा वटवृक्ष मिळणं फार भाग्याचं असत.(Upendra limaye daughter wedding)
कोणत्याही बाप लेकीच्या आयुष्ट्य येणार सगळ्यात भावनिक क्षण म्हणजे मुलीच लग्न तेव्हा कितीही खंबीर असलेला बाप रडतोच. सामान्य माणूस असो वा पडद्यावर झळकणारा प्रसिद्ध कलाकार सर्वाना या भावनेतून जावं लागत. अशीच प्रेमळ भावना अनुभवण्याचा योग्य आला आहे अभिनेता उपेंद्र लिमये.

दमदार आवाज आणि अभिनय या दोन्ही गोष्टींसाठी ओळखला जाणारा अभिनेता उपेंद्र लिमयेची मुलगी भैरवीचा नुकताच विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी भैरवीचा सजलेला लुक पाहून भावनिक झालेल्या उपेंद्रचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. भैरवीचा सजलेला लुक पाहून काजळाचा तीट लावा असं म्हणत लेकीच्या लुकच कौतुक करताना उपेंद्र या व्हिडिओ मध्ये दिसत आहे.(Upendra limaye daughter wedding)
तसेच भैरवीच्या लग्नाचे सुंदर फोटोज ही प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडले आहेत. उपेंद्र लिमये यांनी या आधी बऱ्याच चित्रपटामधून दर्जेदार काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.