शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उमेश कामतची एकाच वेळी दोन स्वप्नं पूर्ण, पोस्ट शेअर करत सांगितली आनंदाची गोष्ट, म्हणाला, “हाऊसफुल्ल…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 14, 2024 | 10:23 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Umesh Kamat shared a video and said that his two dreams have come true.

उमेश कामतची एकाच वेळी दोन स्वप्न पूर्ण, पोस्ट शेअर करत सांगितली आनंदाची बातमी, म्हणाला, "हाऊसफुल्ल..."

मराठी मालिकाविश्व, रंगभूमी, सिनेसृष्टीत तसेच  ओटीटीद्वारे आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता म्हणजे उमेश कामत. उमेशने आजवर अनेक दर्जेदार चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिनही त्याची आणि प्रियाची जोडीही प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडते. ते दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

उमेशही त्याच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टद्वारे त्याने त्याची दोन स्वप्नं पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. उमेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमागे पुष्पा-२चे लोकप्रिय गाणे वाजताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

या व्हिडीओसह उमेशने असं म्हटलं आहे की, “दोन स्वप्न पूर्ण झाली. १८ मे ला २ नाटकांचे सलग ३ प्रयोग केले आणि याचा अनुभव खूपच कमाल होता. त्यानंतर १९ मे ला NCPA TATA Theatre ला ‘जर तरची गोष्ट’चा प्रयोग केला. हे नाटकही हाऊसफुल्ल झाले आणि या नाटकाचा प्रेक्षकवर्गही बहारदार होता” असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा – कर्क, कन्या व कुंभ राशीच्या लोकांनी शुक्रवारी गुंतवणूक टाळावी, तुमचा दिवस कसा असेल? जाणून घ्या…

उमेशने शेअर केलेल्या या व्हिडीओला त्याच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर  मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनीही या व्हिडीओखाली त्याला कमेंट्सद्वारे अभिनंदन असं म्हटलं आहे. सोनाली खरेने “वाह अभिनंदन” अशी कमेंट केली आहे. तर ऋजुता देशमुख, पल्लवी वैद्य यांनीही उमेशचे कमेंट्सद्वारे कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – अस्तिकट्यार मिळवण्यासाठी नेत्रा-इंद्राणीचा रुपालीविरुद्ध नवीन प्लॅन, प्लॅनमध्ये रुपाली स्वत: फसणार? की राजाध्यक्षांनाच फसवणार?

दरम्यान, शांत स्वभाव, समजूतदारपणा व सहज सुंदर अभिनय करत उमेशने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केलं आहे. तसेच चित्रपट, नाटक, मालिका, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. उमेश नुकताच ‘मायलेक’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याचबरोबर त्याचे सध्या रंगभूमीवर ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सुरु आहे. या नाटकालाही प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.   

Tags: marathi actormarathi entertainment newsumesh kamat
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

साक्षीचे अर्जुन-चैतन्यवर गंभीर आरोप, नवऱ्यावरील आरोपानंतर सायली धडा शिकवणार का?, येणार रंजक वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.