रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अस्तिकट्यार मिळवण्यासाठी नेत्रा-इंद्राणीचा रुपालीविरुद्ध नवीन प्लॅन, प्लॅनमध्ये रुपाली स्वत: फसणार? की राजाध्यक्षांनाच फसवणार?

Saurabh Moreby Saurabh More
जून 14, 2024 | 9:33 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update Netra and Indrani prepared a new plan against Rupali to get Astiktyar

अस्तिकट्यार मिळवण्यासाठी नेत्रा-इंद्राणीचा रुपालीविरुद्ध नवीन प्लॅन, प्लॅनमध्ये रुपाली स्वत: फसणार? की राजाध्यक्षांनाच फसवणार?

झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपाली अतिकट्यारचा नाश करण्यासाठी घराबाहेर पडून ते जाळण्याचा प्रयत्न करते. मात्र ती अस्तिकट्यार न जाळताच पुन्हा घरी येते. घरी येताच रुपाली नेत्रा व इंद्राणी यांना ती देवळात गेली असल्याचे सांगते. मात्र नेत्राला पेट्रोलच्या वासावरुन रुपालीचा संशय येतो. त्यामुळे इंद्राणी रुपालीवर लक्ष ठेवावे लागेल असं म्हणते. यानंतर रुपाली तिच्या खोलीत येऊन अस्तिकट्यार नेत्रा व इंद्राणी यांच्या हातात लागू न देण्याबद्दल मनातल्या मनात स्वतःशीच बोलते.

यानंतर राजाध्यक्ष कुटुंबीय त्यांच्या प्लॅननुसार केतकी काकूला विरोचकाच्या म्हणण्यानुसार वागायला सांगतात. सगळे स्वयंपाक घरात असताना विरोचक तिथे येतो  आणि इतक्यात सगळे तिथून निघून जातात. मात्र केतकी काकू तिथे थांबून रुपालीला जेवायला सांगते. यावर रुपाली खुश होऊन तूच एकटी माझ्याबरोबर बोलत आहेस बाकी कुणी काही बोलत नाही असं म्हणते. यावर केतकीही तिच्या हो ला हो म्हणते. यावरून रुपालीला असं वाटतं की केतकी काकू तिच्या जाळ्यात फसली आहे. मात्र केतकी काकू रुपालीला राजाध्यक्ष कुटुंबियांनी बनवलेल्या प्लॅनमध्ये फसवत आहे.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

आणखी वाचा – “बाळूमामांमुळेच कुटुंबावरील संकट टळलं”, बाळूमामा साकारणाऱ्या अभिनेत्याने सांगितला प्रसंग, आली प्रचिती

पुढे ठरलेल्या प्लॅन प्रमाणे केतकी काकू रुपालीच्या खोलीत जाऊन रुपालीच्या शरीरात असलेल्या विरोचकामुळे हे सगळं होत आहे. त्याने रुपाली कडून करवून घेतलेल्या कृत्यांमुळे घरातील सगळे जण रुपाली विरुद्ध असं वागत असल्याचे केतकी काकू रुपालीला सांगतात. तुझ्या शरीरात असलेल्या त्या राक्षसाने आपले सोन्याचसारखे घर तोडले असल्याचे केतकी काकू रुपालीला सांगतात. यादरम्यान रुपाली हे सगळं काही तिनेच केलं असल्याचे केतकी काकूसमोर नाटक करते. मात्र केतकी काकू हे सगळं तिने न करता तिच्या शरीरातील राक्षसाने केले असल्याचे तिला वारंवार सांगत असतात. पुढे केतकी काकू मला घरातील सर्वांची मनं जिंकायची असल्यचे म्हणते.

आणखी वाचा – कर्क, कन्या व कुंभ राशीच्या लोकांनी शुक्रवारी गुंतवणूक टाळावी, तुमचा दिवस कसा असेल? जाणून घ्या…

या सगळ्यात केतकी काकू रुपालीला  मी तुझ्याबरोबर आहे. तू जे काही करशील त्यात मी तुला साथ देईन असा विश्वास देते. त्यामुळे आता केतकी काकूच्या मदतीने राजाध्यक्ष कुटुंबियांचा रुपालीविरुद्धचा प्लॅन यशस्वी होणार का? की राजाध्यक्षच कुटुंबीयच रुपालीच्या प्लॅमध्ये फसणार? हे पुढील मालिकेच्या पुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Paaru Serial Update

अहिल्यादेवींनी आदित्यची जबाबदारी पारूवर सोपवली, गैरसमजही झाला दूर, दोघांचं नातंही करणार का मान्य?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.