९० च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. लाईव्ह शोमध्ये उदित नारायण महिला चाहत्यांना किस करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टेजवर ‘टिप-टिप बरसा पानी’ गाणं गाताना जमलेल्या चाहत्यांना किस करतानाचा उदित नारायण यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उदित नारायण एक नव्हे, दोन नव्हे, तर चार महिलांचा किस करताना दिसत आहे. उदित नारायण यांच्या वर्तनामुळे सध्या ते टीकेचे धनी झाले आहेत. अशातच त्यांचा मित्र आणि गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी उदित यांना ‘खिलाडी’ असं म्हटलं आहे. (Amitabh Bhattacharya on Udit Narayan Lip Kiss)
अभिजीत भट्टाचार्य यांनी उदित यांना ‘खिलाडी’ असं म्हटलं असून त्यांची खिल्ली उडवली आहे. शिवाय उदित यांचा एक जुना व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उदित नारायण आणि अभिजीत भट्टाचार्य परफॉर्म करत आहेत. दोघेही ‘मैं खिलाडी तू अनारी’ हे गाणे गात आहेत. हे शेअर करताना अभिजीत यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हा खेळाडू आहे आणि मी अनाड़ी आहे’ शिवाय त्यासोबत हसणारा इमोजीही पोस्ट केला आहे. अमिताभ यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही कमेंटमध्ये उदित यांची खिल्ली उडवली आहे.
आणखी वाचा – गावात भूत येणार अन् मुलांची तारांबळ…; ‘दहावी-अ’ नव्या वळणावर, पुढील भागात नक्की काय होणार?
“अरे वाह सर काय टायमिंग आहे”, “अमिताभजी तुम्ही खूप हुशार आहात”, “अमिताभजी तुम्ही किती कमाल मित्र आहात”, “मित्राकडून मित्र ट्रोल”, “असा मित्र दुश्मनांनाही नको मिळायला”, “मौके पे चौका मारा” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी अमिताभ यांच्या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. उदित नारायण यांच्या किस केल्याच्या व्हिडीओसह अमिताभ भट्टाचार्य यांनी शेअर केलेला हा व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी ८०-९० चा काळ गाजवला आहे. त्यांच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. आजही त्यांचे अनेक लाईव्ह शो होतात. अशाच एका लाईव्ह शोमधील व्हिडीओमुळे उदित नारायण सध्या प्रसिद्धीझोतात आले आहेत. महिला चाहत्यांना किस केल्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे. हे उदित नारायण नाही, इमरान हाश्मी आहेत, अशा प्रतिक्रिया देत नेटकरी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत.