मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही मनोरंजन क्षेत्रात काम करण्याबरोबरच कंटेट क्रिएटरदेखील आहेत. मालिका, नाटक, चित्रपटांतून काम करण्याबरोबरच हे कलाकार सोशल मीडियावर विविध व्हिडीओ पोस्ट करत असतात. असाच एक सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे संकेत कोर्लेकर. संकेत हा अभिनय क्षेत्रात तर सक्रीय आहेच पण तो सोशल मीडियावरदेखील कायम सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. काही मजेशीर, व्यंगात्मक किंवा समाजप्रबोधन करणारे अनेक व्हिडीओ तो शेअर करत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. शिवाय युट्यूबवरदेखील त्याचे अनेक सबस्क्राईबर्स आहेत. (Sanket Korlekar received YouTube silver play button)
युट्यूबवरील अनेक व्हिडीओमध्ये संकेतला त्याची बहीण उमा हिचीदेखील साथ मिळते. उमादेखील एक अभिनेत्री आहे. काही महिन्यांपूर्वी ती ‘स्टार प्रवाह’च्या ‘साधी माणसं’ मालिकेत पाहायला मिळाली होती. अशातच दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठी कामगिरी केली आहे, ती म्हणजे दोघांना युट्यूबकडून सिल्व्हर प्ले बटण मिळालं आहे आणि यानिमित्त अभिनेत्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने त्याच्या आई-वडिलांच्या कष्टाबद्दलही सांगितलं आहे. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे आणि त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.
या पोस्टमध्ये संकेतने असं म्हटलं आहे की, “घरात लहानपणापासून आई-पप्पांनी आम्हा दोघांना मोठं करण्यासाठी केलेला संघर्ष बघत मोठे झालो आहोत. पप्पांची दोन वेळच्या जेवणासाठी मेहनत आणि आईची कमी पगारात केलेली काटकसर स्वतःच्या डोळ्यांनी बघितली आहे. आई-वडिलांनी आमच्यासाठी स्वतःचं पोट किती मारलं आहे हे आम्हाला दोघांनाच माहीत. आम्हाला दोघांना आई-वडिलांनी आमच्यावर केलेल्या संस्काराची जाणीव आहे. त्याची किंमत आहे. त्यामुळे आजपर्यंत आई-पप्पांची मान फक्त गर्वाने वर झाली कधीच झुकली नाही. आज त्यांचा मुला-मुलीने एकाच घरात दोन सिल्व्हर प्ले बटण आणले आहेत. आमची स्पर्धा स्वतःशी आहे. त्यामुळे हरायची भीती नाही”.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “कोण किती पुढे जातंय? कोण किती मागे राहतंय? याच्याशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही. आमचे टार्गेट ठरले आहे. आम्हाला इतकं मोठं व्हायचं की, आई-पप्पानी आमचा इतका पैसा बघून टेन्शन घेणेच सोडले पाहिजे. आम्ही क्लिअर आहोत. स्वतःचा रस्ता, स्वतःचे विश्व आणि प्रेक्षकांचे आशीर्वाद. बस्स. बाकी सगळं आमची मेहनत बघून घेईल. धन्यवाद”. दरम्यान, संकेतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘अजूनही बरसात आहे’, ‘लेक माझी दुर्गा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘विठू माऊली’ आणि ‘अंतरपाटSanket Korlekar received YouTube silver play button, Marathi actor Sanket Korlekar, sanket korlekar,sanket korlekar interview,sanket korlekar serial,sanket korlekar reels,sanket korlekar biography,sanket korlekar sister,sanket korlekar family,videos of sanket korlekar,marathi actor,sony marathi,marathi serial,marathi vlog,sanket korlekar vithu mauli,uma korlekar,sanket korlekar fitness videos,colors Marathi, संकेत कोर्लेकरला मिळालं युट्यूब सिल्व्हर प्ले बटण, मराठी अभिनेता संकेत कोरलेकर, संकेत कोर्लेकर, संकेत कोर्लेकर मुलाखत, संकेत कोर्लेकर मालिका, संकेत कोर्लेकर रील, संकेत कोर्लेकर, संकेत कोर्लेकर बहिण, संकेत कोर्लेकर कुटुंब, संकेत कोर्लेकर व्हिडिओ, मराठी कलाकार, मराठी कलाकार, मराठी कलाकार, मराठी कलाकार, मराठी कलाकार, मराठी कलाकार ,मराठी मालिका,मराठी व्लॉग,संकेत कोर्लेकर विठू माऊली,उमा कोर्लेकर,संकेत कोर्लेकर फिटनेस व्हिडिओ,कलर्स मराठी’ मालिकेतून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.