‘शॉर्क टँक इंडिया’ फेम आणि ‘भारत पे’चे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अश्नीर ‘बिग बॉस १८’ शोच्या ‘वीकेंड का वॉर’मध्ये सहभागी झाला होते. यावेळी जेव्हा सलमान खानने अश्नीर ग्रोव्हरला स्टेजवर बोलावले तेव्हा त्याने पूर्वी केलेल्या काही विधानांवरुन प्रश्न विचारले होते. या संभाषणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता अश्नीरने पुन्हा एकदा सलमान खानशी पंगा घेतला आहे. अश्नीरने नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी बोलताना अश्नीरने सलमान खानच्या ‘बिग बॉस १८’मधील संभाषणावर भाष्य केलं. (ashneer grover on salman khan)
अश्नीर ग्रोव्हरने नुकताच त्याचा रिॲलिटी शो ‘राईज अँड फॉल’ लाँच केला. एनआयटी कुरुक्षेत्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्याने सलमान खानच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली. सलमानच्या या वक्तव्यावर तो म्हणाला, “अनावश्यक पावले उचलून स्वतःची स्पर्धा निर्माण केली. मला बोलावल्यावर मी शांतपणे गेलो. आता नाटक रचण्यासाठी तुम्ही कोणाला सांगा की, मी तुम्हाला कधीच भेटलो नाही. मला तुझे नावही माहित नाही. अरे, जर माझं नाव माहित नाही, तर तू मला बोलावलं का? मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की, तुम्ही जर माझ्या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहात तर तुम्ही मला न भेटता बँड अॅम्बेसेडर होऊच शकत नाही”.
आणखी वाचा – गावात भूत येणार अन् मुलांची तारांबळ…; ‘दहावी-अ’ नव्या वळणावर, पुढील भागात नक्की काय होणार?
पूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अश्नीर ग्रोव्हरने सलमान खान बद्दलच्या एका प्रसंगाचा उल्लेख केला होता. ज्यामध्ये त्याने सांगितलं होतं की, एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी तो सलमान खानला भेटला होता आणि सलमान खानच्या मॅनेजरने त्याला सांगितलं होतं की, सलमान त्याच्याबरोबर फोटो काढणार नाही. याबद्दल ‘बिग बॉस १८’ मध्ये सलमान खानने अश्नीर ग्रोव्हरला सर्वांसमोरच प्रश्न विचारले होते.
आणखी वाचा – १० कोटी रुपये देऊन महामंडलेश्वर बनल्याच्या आरोपांवर ममता कुलकर्णींचे भाष्य, म्हणाल्या, “माझ्या खात्यात…”
यावेळी अश्नीरने गप्प राहून सलमान खानला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करणं सगळ्यात योग्य निर्णय असल्याचंही सांगितलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी सलमान खानची माफी देखील मागितली होती. दरम्यान, आता अश्नीर ग्रोव्हरचा व्हिडीओ व्हायरल होत असून लोक या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.