‘इट्स मज्जा’च्या नवीन ‘दहावी-अ’ या वेब सीरिजला आतापर्यंत भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस या सीरिजची लोकप्रियता वाढत असून सीरिजमध्ये पुढे काय होणार? ही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलेली असते. आतापर्यंत या सीरिजचे एकूण आठ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. शाळेचे नुकसान केलेल्या मुलांना पुन्हा एकदा शाळेत यायची संधी मिळाली आहे. त्यांनी मेहनत घेत शाळेचे नुकसान भरुन काढले आणि त्यांना शाळेत प्रवेश मिळाला. नुकत्याच झालेल्या भागात रेश्मा व केवडा यांच्यात गैरसमज झालेले पाहायला मिळाले. शिवाय शिंदे सरांच्या क्लास येण्यासाठी अधिकचे पैसे नसल्यामुळे आभ्या येऊ शकणार नाही. ही समजताच केवडा नाराजही झाली होती. (Dahavi-A Series daily updates)
अशातच गेल्या भागात शाळेत नाटकाची नोटीस आली असून यात सर्वांनी सहभाग घेतला आणि यावेळी केवडा आभ्याची नाटकातली बायको बनली होती. या नाटकाच्या प्रयोगासाठी सगळी मुलं तालुक्यात गेली होती. तसंच सुरुवातीला साशंक असलेल्या मुलांनी नाटकाचे उत्तम सादरीकरण केले आणि पारितोषिकही मिळवलं. सागऱ्या व मध्या यांच्यात थोडी भांडणंही झाली. पण कांबळे सरांनी मुलांना एकतेचे महत्त्व पटवून दिले आणि इथे तुम्ही शाळेचे प्रतिनिधित्व करत आहात. त्यामुळे नीट वागण्याचा सल्लाही दिला.
नाटक संपल्यानंतर घरी येताच केवडाने आभ्या, मध्या, रेश्मा यांच्या गावडी जाण्याचा हट्ट धरला. यावेळी कांबळे सरांनीही तिचं ऐकत तिला आभ्या, मध्या, रेश्मा यांच्या गावी आणले. यामुळे आभ्या खूपच खुश होता. तर तिच्याबरोबर ज्योतीही आल्यामुळे मध्यालाही आनंद झाला होता. यावेळी आभ्याकी आई तिला रात्रभर घरी राहण्याविषयी सुचवते. मात्र रेश्मा यावर केवडाची आई वाट बघत असेल असं म्हणत तो विषय टाळते. पुढे दाद्या व आई मध्याचे पारितोषिक मिळाल्यानिमित्त कौतूक करतात.
अशातच आता पुढील भागात गावात भूत येणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. गावातील स्त्रिया भुताविषयी बोलतानाचे मुलं ऐकणार आहेत आणि यामुळे आभ्या, किरण्या, विक्या आणि मध्या यांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. त्यामुळे आता यातून ही मुलं कसा मार्ग काढणार? आणि पुढील भागात नक्की काय होणार? हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.