कुठल्याही, कोणाच्याही मेहनतीचं फळ जेव्हा मिळत तेव्हा स्वतःला वाटणारा आनंद आणि समोरच्याला वाटणारा अभिनमान या दोन्ही गोष्टी सुखदायक असतात. सध्या प्रत्येक भारतीयांच्या मनात असाच अभिमान आणि आनंद आहे तो भारताच्या दोन अप्रतिम कलाकृतींना मिळालेला बहुमान पाहून. ९५ व्य ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला २ पुरस्कारानाचा मान मिळाला आहे.(Oscars 2023 Indian Films)
पुरस्कारांच्या यादीत सर्वोत्कृष्ट मानल्या जाणारा मनाचा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. यंदा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे २ ऑस्कर पुरस्कार भारताने पटकावले आहेत. दिगदर्शक राजमौली यांच्या RRR या गाजलेल्या चित्रपटातील ‘नाटु नाटु’ या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. सोबतच बेस्ट डॉक्युमेंटरी श्रेणीत ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ ने सुद्धा हा बहुमान मिळवला आहे.

भारताला मिळालेल्या या मानाचं सर्व स्थरातून कौतुक होत आहे. ‘नाटु नाटु’ गाण्याचे संगीतकार काल भैरव आणि राहुल सिपलग्नज देखील या वेळी उपस्थति होते. रामा राव जुनियर आणि राम चरण यांचा या गाण्यावरील डान्स चांगलाच चर्तेत ठरला होता. जगभरातून लाखो लोकांची पासांती या गाण्याला मिळाली होती. या पुरस्कार सोहळयाला चित्रपटाचे दिगदर्शक राजमौली सोबतच अभिनेता राम चरण आणि अभिनेता रामा राव जुनियर देखील उपस्थति होते.(Oscars 2023 Indian Films)

सोबतच ऑस्करच्या मान मिळालेली ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ ही ४१ मिनिटांची फिल्म एक कुटुंब दोन हत्तींना दत्तक घेऊन त्यांचं संगोपन करत यावर आधारित आहे. तर या लघुपटाची निर्मिती अचित जैन, गुणित मोंगा यांनी केली असून दिगदर्शन कार्तिकी गोन्साल्विस यांनी केले आहे. या लगूपटालाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. दिगदर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात ऑस्कर मिळावं हे मी भाग्यच समजते असं दिगदर्शक कार्तिकी पुस्र्कार स्वीकारताना म्हणाल्या आणि माझ्या भूमीला, माझ्या भारताला हा पुरस्कार मी समर्पित करते असं म्हणत त्यांनी भारतीयांच्या मनात मिळवलेला मान अजून दृढ केला.

लगान नंतर भारताच्या शिरपेचात यंदाच्या ऑस्कर मध्ये हे मानाचंपान खोचण्यात आलं आहे. हा मिळालेला मान पाहून प्रत्येक भारतीयला या गोष्टीचा अभिमान वाटत राहील एवढं नक्की.