सध्या मालिकाविश्वात एका अभिनेत्रीच्या नावाची सतत चर्चा होत आहे, ती म्हणजे जुई गडकरी. छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ मालिकेतून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या जुईची मोठी फॅन फॉलोविंग आहे. शिवाय, तिच्या मालिकेतील भूमिकेमुळे आता ती प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. अनेक मालिका व चित्रपटांमध्ये दिसलेली जुई सोशल मीडियावर तितकीच सक्रिय सुद्धा आहे. ती तिच्या कामाबद्दलची माहिती देताना तिचे फोटोशूट्स नेहमीच चाहत्यांसह शेअर करते. (Jui Gadkari reply to Fan Comment)
नुकतंच जुईने एक फोटोशूट केला आहे, ज्याची चर्चा सध्या होत आहे. जुईने नुकतंच इन्स्टाग्रामवर २.९० लाख फॉलोवर्सचा टप्पा गाठला. त्यानिमित्त तिने हा फोटोशूट केला. त्याचे काही फोटोज तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. लाल रंगाची साडी, त्यावर केलेला साजशृंगारात जुई अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोशूटमध्ये जुई जमिनीवर बसली असल्याचे दिसते. तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
हे देखील वाचा – “आईच्या इच्छेखातर…” ऋतुजा बागवेला नवीन घर घेण्यास तिच्या आई-वडिलांनी दिला होता पाठिंबा, म्हणाली, “माझ्या बाबांनी मला…”
या फोटोशूटमधील काही फोटोज शेअर करताना अभिनेत्रीने २.९० लाख फॉलोवर्सचा टप्पा गाठल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहे. दरम्यान, याच फोटोशूटवर एका चाहत्याने कमेंट केली असून त्याच्या या कमेंटवर जुईने रिप्लाय दिला, त्याची चर्चा होत आहे. कमेंटद्वारे चाहत्याने जुईला विचारलं की, “फोटो छान आहे. पण तुम्ही खाली का बसला?” त्यावर ती म्हणाली, “माणसाने नेहेमी जमिनीवरच राहावं”. तिचा हा रिप्लाय चाहत्याला प्रचंड आवडला आणि कमेंट करत म्हणाला, “खरंय, जीवनात अक्षरशः नाही. पण तुमचा हजरजबाबीपणा आवडला. बाकी काही नाही तुमची इतकी सुंदर साडी खराब होईल म्हणून म्हटलं.” चाहत्याची ही कमेंट तिलादेखील आवडली.
हे देखील वाचा – “असा अनुभव तुम्हाला आला?” प्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेने गायलं कंगना रानौतच्या चित्रपटासाठी गाणं, अभिनेत्रीने केली कमेंट, म्हणाली, “शेवटी तू…”

‘पुढचं पाऊल’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली जुई पुढे अनेक मालिका व चित्रपटांमध्ये दिसली. त्याचबरोबर ती ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात झळकली आहे. मध्यंतरी तिच्या लग्नाबद्दल अनेक बातम्या येत होत्या, जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, या अफवा असल्याचे तिने सांगितले होते. शिवाय, तिची ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत टॉपमध्ये आहे.