‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अखेर अक्षरा व अधिपती यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरा-अधिपती यांच्या प्रेमाचा ट्रॅक सुरु असलेला पाहायला मिळत होता. मात्र हे दोघेही एकमेकांसमोर प्रेमाची कबुली केव्हा देणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर प्रेक्षकांच्या मनातील इच्छा अक्षरा व अधिपती यांनी पूर्ण केलेली पाहायला मिळत आहे. (Tula Shikwin Changlach Dhada Promo)
अक्षराने मराठमोळ्या आणि पारंपरिक पेहरावात तसेच कोल्हापुरी रांगड्या भाषेत अधिपतीला प्रपोज केलेलं पाहायला मिळालं. अक्षराच्या या सीनची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली तर प्रेक्षकांमध्येही आनंदाच वातावरण पाहायला मिळालं. यानंतर आता अधिपतीने अक्षरावरील प्रेमाची कबुली दिली आहे. याचा एक प्रोमो नुकताच समोर आला असून अधिपतीनेही अक्षराच्या प्रेमाबाबत थोडी हिंट होती आणि त्यालाही बरेच दिवसांपासून हे सांगायचं होत हे कबूल केलं आहे.
या प्रोमोमध्ये अधिपती अक्षराला असं बोलताना दिसत आहे की, “पहिल्या दिवसापासून तुमच्या दिसण्यापेक्षा तुमचे विचार आम्हाला लय आवडले. माणूस म्हणून तुम्ही आम्हाला लय आवडता. आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही आमच्या प्रेमात पडणार नाहीत यावरुन मास्तरीणबाई आमच्या प्रेमात पडणार नाही असंच मला वाटलं होतं. पण नंतर तुमचं बदललेलं वागणं पाहून मला पण तुम्ही आमच्या प्रेमात पडला असल्याचा अंदाज आला होता”. यावर अक्षरा अधिपतीला विचारते की, “आणि तरी तुम्ही काही बोलला नाहीत ना?”.
यावर अधिपती अक्षराला म्हणतो, “शाब्बास. म्हणजे आम्हीच विचारायचं का मास्तरीणबाई तुम्ही आमच्या प्रेमात पडला आहात का?, असं असत का?, जो माणूस प्रेमात पडला आहे त्याने कबूल करायचं”. आता मालिकेत अखेर अक्षरा व अधिपती यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली आहे. आता हे सर्व भुवनेश्वरीला कळणार तेव्हा काय होणार?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.