मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अक्षरापाठोपाठ अधिपतीनेही दिली प्रेमाची कबुली अन्…; बायकोचं तोंडभरुन कौतुकही केलं, म्हणाला, “तुमच्या दिसण्यापेक्षा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 10, 2024 | 11:34 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikwin Changlach Dhada Promo

अक्षरापाठोपाठ अधिपतीनेही दिली प्रेमाची कबुली अन्…; बायकोचं तोंडभरुन कौतुकही केलं, म्हणाला, "तुमच्या दिसण्यापेक्षा…"

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अखेर अक्षरा व अधिपती यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरा-अधिपती यांच्या प्रेमाचा ट्रॅक सुरु असलेला पाहायला मिळत होता. मात्र हे दोघेही एकमेकांसमोर प्रेमाची कबुली केव्हा देणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर प्रेक्षकांच्या मनातील इच्छा अक्षरा व अधिपती यांनी पूर्ण केलेली पाहायला मिळत आहे. (Tula Shikwin Changlach Dhada Promo)

अक्षराने मराठमोळ्या आणि पारंपरिक पेहरावात तसेच कोल्हापुरी रांगड्या भाषेत अधिपतीला प्रपोज केलेलं पाहायला मिळालं. अक्षराच्या या सीनची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली तर प्रेक्षकांमध्येही आनंदाच वातावरण पाहायला मिळालं. यानंतर आता अधिपतीने अक्षरावरील प्रेमाची कबुली दिली आहे. याचा एक प्रोमो नुकताच समोर आला असून अधिपतीनेही अक्षराच्या प्रेमाबाबत थोडी हिंट होती आणि त्यालाही बरेच दिवसांपासून हे सांगायचं होत हे कबूल केलं आहे.

आणखी वाचा – वृक्षवल्ली आम्हा सोयरे! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं सामाजिक भान, ट्रिपला गेल्यानंतर लावली झाडं, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

या प्रोमोमध्ये अधिपती अक्षराला असं बोलताना दिसत आहे की, “पहिल्या दिवसापासून तुमच्या दिसण्यापेक्षा तुमचे विचार आम्हाला लय आवडले. माणूस म्हणून तुम्ही आम्हाला लय आवडता. आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही आमच्या प्रेमात पडणार नाहीत यावरुन मास्तरीणबाई आमच्या प्रेमात पडणार नाही असंच मला वाटलं होतं. पण नंतर तुमचं बदललेलं वागणं पाहून मला पण तुम्ही आमच्या प्रेमात पडला असल्याचा अंदाज आला होता”. यावर अक्षरा अधिपतीला विचारते की, “आणि तरी तुम्ही काही बोलला नाहीत ना?”.

आणखी वाचा – सायली-प्रतिमाचं नातं येणार समोर?, किल्लेदारांची लेक असल्याचं सत्य समजणार का?, रविराज मुलगी म्हणून करणार का स्वीकार?

यावर अधिपती अक्षराला म्हणतो, “शाब्बास. म्हणजे आम्हीच विचारायचं का मास्तरीणबाई तुम्ही आमच्या प्रेमात पडला आहात का?, असं असत का?, जो माणूस प्रेमात पडला आहे त्याने कबूल करायचं”. आता मालिकेत अखेर अक्षरा व अधिपती यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली आहे. आता हे सर्व भुवनेश्वरीला कळणार तेव्हा काय होणार?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialtula shikwin changlach dhadaTula Shikwin Changlach Dhada Promozee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Prathamesh Laghate and Mugdha Vaishampayan expressed their anger on Vaishnodevi terror attack

वैष्णोदेवी दहशतवादी हल्याप्रकरणी मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी व्यक्त केला राग, सोशल मीडियावर भयावह दृश्य शेअर करत म्हणाले...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.