तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत चारुलताची एन्ट्री झाल्यापासून मालिकेला एक वेगळंच वळण आलं आहे. अक्षराने स्वत:हून तिला घरी आणलं होतं. यानंतर अक्षराला चारुलता व भुवनेश्वरी यांच्यातील सत्य समजते. काही दिवसांपूर्वी बाजारात अक्षराला चारुलता भुवनेश्वरी असल्याचा भास होतो आणि त्यानंतर ती हे घरातील सर्वांना सांगते. पण तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर घरातील सर्व तिला वेडी ठरवतात. यामुळे भुवनेश्वरी तिला प्लॅन करुन हॉस्पिटलमध्ये दाखल करते. (Tula Shikvin Changalach Dhada Serial Updates)
चारुलता भुवनेश्वरी असल्याबद्दल कुणालाच काहीही कल्पना नाही आणि तिच्या याच जाळ्यात सूर्यवंशी कुटुंबीय अडकले आहेत. एकीकडे अक्षरा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे, तर दुसरीकडे भुवनेश्वरी तिची चाल खेळणार आहे एकीकडे अक्षरा रुग्णालयात असताना दुसरीकडे, घरात भुवनेश्वरी आणि चारुहासच्या लग्नाचा घाट घालण्यात येतो. सुनेच्या अनुपस्थितीत लग्न व्हावं अशी चारुहासची अजिबात इच्छा नसते. पण, चारुलता (भुवनेश्वरी) त्याचं मतपरिवर्तन करण्यात यशस्वी होते.
मालिकेच्या सोमवारच्या भागात अधिपती अक्षराला भेटायला गेला असताना टी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. यावेळी अक्षरा अधिपतीला भुवनेश्वरी चारुलता बनून सर्वांची फसवणूक करट असल्याचे सांगते. मात्र या अक्षराने या सगळ्यांकडे दुर्लक्ष करुन आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावे असं सांगतो. तसंच यावेळी अक्षरा अधिपतीला बजरंगविषयीही सांगते. मात्र अधिपती बजरंग जेलमध्येच असल्याचे तिला सांगतो. अशातच आता अक्षरा भुवनेश्वरीचा प्लॅन उधळून लावणार आहे.
आणखी वाचा – गोविंदाबरोबरचा कृष्णा अभिषेकचा वाद मिटला, पण मामी अद्यापही नाराज, म्हणाला, “माफी मागितली तरीही…”
बजरंग हॉस्पिटलमध्येच आहे हे सिद्ध करण्यासाठी अक्षरा आता नवीन प्लॅन करणार आहे आणि या नवीन प्लॅनचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये बजरंग अक्षराच्या खोलीत येतानाचे पाहून ती त्याच्या नकळत फळांच्या डिशमध्ये मोबाइल लपवते. जेणेकरून तिच्याकडे बजरंगविरुद्ध पुरावा असावा. पुढे या प्रोमोमध्ये अक्षरा बजरंगला “हे सगळं तू एकट्याने कसं मॅनेज केलंस” असं विचारते. पुढे या प्रोमोमध्ये बजरंग अक्षराला उत्तर देताना असं म्हणतो की, “हे सगळं एकट्याचं काम नाही”.
आणखी वाचा – तितीक्षा तावडेचा नवा विक्रम, युट्यूबकडून अभिनेत्रीचा सन्मान, म्हणाली, “२०२३मध्ये चॅनल सुरु केलं आणि…”
यावर अक्षरा त्याला असं म्हणते की, “तुला कोण मदत करणार आहे?” यावर बजरंगच्या तोंडून भुवनेश्वरी हे नाव येते. पण तो ते नाव अर्धच घेतो आणि थांबतो. यावरुन अक्षराला भुवनेश्वरीच्या प्लॅनची कल्पना येते. त्यामुळे आता अक्षरा बजरंगचा खरा चेहरा लोकांसमोर आणणार का? या सगळ्यात त्याच्याबरोबर भुवणेश्वरी असल्याचे ती सिद्ध करणार का? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.