शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

देवदत्त नागेच्या लूकची चर्चा; ‘घबाडकुंड’मुळे वाढली उत्सुकता, काय असणार रहस्य?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 21, 2026 | 9:32 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Devdatta Nage

देवदत्त नागेच्या लूकची चर्चा; ‘घबाडकुंड’मुळे वाढली उत्सुकता, काय असणार रहस्य?

Devdatta Nage : हिंदी आणि तेलुगू सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यानंतर अभिनेता देवदत्त नागे आता मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण करत आहे. आतापर्यंत प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आलेला अभिनेता देवदत्त नागे आता पुन्हा एकदा नव्या आणि दमदार अवतारात दिसणार आहे. आपल्या भूमिकांमध्ये नेहमीच वैविध्य जपणाऱ्या देवदत्त नागे यांचा ‘घबाडकुंड’ या आगामी चित्रपटातील लूक विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. आतापर्यंत ‘आदिपुरुष’मधील हनुमंत, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’मधील सूर्याजी मालुसरे, ‘सत्यमेव जयते’मधील इन्स्पेक्टर शंकर गायकवाड, तसेच ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ मधील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आणि तेलगू चित्रपट ‘कमसराजू’ मधील ‘देवकी नंदन वासुदेवा’सारख्या विविध व्यक्तिरेखांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद प्रभावीपणे सिद्ध केली आहे. प्रत्येक भूमिकेत नवं काहीतरी सादर करत त्यांनी स्वतःची वेगळी आणि ठळक ओळख निर्माण केली आहे.

आता मात्र देवदत्त एका पूर्णपणे नव्या आणि अनपेक्षित अवतारात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘घबाडकुंड’ या आगामी चित्रपटामधील ‘खंग्री’ या त्यांच्या भूमिकेचा रांगडेपणा तीव्र आणि गूढ लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तीक्ष्ण नजर आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्स यामुळे त्यांच्या या व्यक्तिरेखेभोवती रहस्यमय आकर्षण निर्माण झालं आहे. या चित्रपटासाठी त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात केलेला बदल, त्यासाठी घेतलेली मेहनत यांतून त्यांचा हा लूक अधिक प्रभावी ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. काहीतरी वेगळं सादर करण्याची देवदत्त नागे यांची खासियत या नव्या अवतारातूनही ठळकपणे दिसून येत आहे.

आणखी वाचा – कॅन्सरशी लढताना सुप्रसिद्ध अभिनेत्री काय खाते?, आहारा’बद्दल सांगत म्हणाली, “हेल्दी फूड…”

प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच या चित्रपटाबद्दल उत्सुकता असून, देवदत्त नागे यांच्या या दमदार लूकमुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘घबाडकुंड’मधून प्रेक्षकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. कल्पनेच्या पलीकडचं ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ या चित्रपटासाठी लाभली आहे. ‘आयकॉन दी स्टाईल’ या निर्मितीसंस्थे अंतर्गत साकारलेला मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘घबाडकुंड’ येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Tags: devdatta nagemarathi actormarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
The Maharashtra Files Trailer

“ही सरकारी फाईल आहे, 10 जणांचा हात लागल्याशिवाय मंजूर होत नाही”, ‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचे दमदार संवाद लक्षवेधी, कधी प्रदर्शित होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.