‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका सध्या नवीन वळणावर आली आहे. मालिकेत सध्या अधिपती व अक्षरा यांच्या हनिमूनचा सिक्वेन्स पाहायला मिळत आहे. हनिमूनसाठी अधिपती व अक्षरा हे थायलंडमध्ये गेले असून याचे काही खास क्षण आता मालिकेत बघायला मिळत आहेत. मालिकेत आता हनिमून स्पेशल भाग पाहायला मिळणार असून अधिपती-अक्षरा यांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. या हनिमून स्पेशल भागांचे नवीन प्रोमो सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळत असून या नवीन प्रोमोला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.
अशातच अधिपती-अक्षरा यांचा एक नवीन प्रोमो भेटीला आला आहे. ज्यात दोघांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये त्यांचा लुकही वेगळा आहे. यासाठी अधिपतीने पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे तर अक्षराने फुलांची डिझाईन असलेला वनपीस ड्रेस परिधान केला आहे. त्यांच्या या रोमान्ससाठी ‘प्यारवाली लव्हस्टोरी’मधील ‘जरा जरा’ हे खास प्रेमगीतही लावण्यात आले आहे. या नवीन प्रोमोला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून अनेकांनी कमेंट्सद्वारे त्यांना हा नवीन प्रोमो आवडल्याचे म्हटलं आहे. अधिपती व अक्षरा यांच्यातील हे बहरणारे प्रेम त्यांच्या चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडत आहेत.
आणखी वाचा – आर माधवन झाला मुंबईकर, ‘या’ ठिकाणी घेतलं नवीन आलिशान घर, एकूण किंमत आहे…
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अधिपती व अक्षरा यांच्या हनिमूनसाठी संपूर्ण टीम नुकतीच थायलंड, फुकेत येथे गेली असल्याचे पाहायला मिळालं. अक्षरा व अधिपती यांच्यासह मालिकेची संपूर्ण टीम थायलंडला रवाना झाली. याची खास झलक निर्माती शर्मिष्ठा राऊत हिने एका व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली होती. तर, शिवानी रांगोळेनेदेखील फुकेतमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
दरम्यान, झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अधिपती हा श्रीमंत घरचा मुलगा आहे, तर अक्षरा ही एका शाळेतील शिक्षिका आहे. मालिकेत अक्षरा-अधिपती यांच्या नवीन केमिस्ट्रीला सुरुवात झाली असून हे केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.