झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कथानकात येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. या मालिकेतील अक्षरा व अधिपती या जोडीलाही प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. अशातच मालिकेत अक्षरा व अधिपती यांच्या प्रेमात विरजण टाकायला एका पात्राची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. भुवनेश्वरीने नवी चाल आखत अक्षरा व अधिपतीच्या संसारात मिठाचा खडा टाकण्यासाठी सरगमला आणलं आहे.
नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला, ज्यामध्ये भुवनेश्वरी सरगमला अधिपती व अक्षरा व अधिपती यांचे लग्न मोडण्यास सांगते. या व्हिडीओमध्ये भुवनेश्वरी तिला असं म्हणते की, “तुला अधिपतीला प्रेमात पाडायचं नाही, तर त्या दोघांचे लग्न मोडणे हा आमचा उद्देश आहे.” दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांना हा नवीन ट्विस्ट आवडत नसल्याचे म्हटले आहे.
या व्हिडीओखाली कमेंट करत एकाने असं म्हटलं आहे की, “बकवास मालिका, अधीपती वेडा वाटतोय आता.. बंद करा ही मालिका आता.” तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “संगीत शिकवणे म्हणजे सरस्वतीची आराधना करणे असते. शिकवायच्या नावाखाली फालतू धंदे करायला लावणे ते पण भुवनेश्वरी बाईकडून अपेक्षित नाही” तर आणखी एकाने “आधी ही मालिका चांगली होती पण आता ही मालिका बघणे आम्ही बंद केले आहे” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने अधिपतीविषयी “इतका आईवेडा कुणीही नसतो. अधिपतीला स्वत:ची बुद्धी नाही का?” अशी कमेंट केली आहे.
आणखी वाचा –

या व्हिडीओला काही चाहत्यांनी कमेंट्सद्वारे नापसंती दर्शवली आहे तर काहींना हा नवीन ट्विस्ट आवडत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, येत्या भागात सरगम मॅडम अधिपतीला त्यांच्या प्रेमात जाळ्यात ओढणार का? भुवनेश्वरीच्या इच्छेप्रमाणे अधिपती व अक्षरा यांचे लग्न मोडण्यात ती यशस्वी होणार का? तसेच भुवनेश्वरीने सांगितलेलं कार्य सरगम पार पाडू शकेल का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.