सोमवार, एप्रिल 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खरेदी केलं नवं घर, अक्षय्य तृतीयेनिमित्त पूजाही केली, कलाकारांकडून कौतुक अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 10, 2024 | 1:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aditi Dravid Baught New Home

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खरेदी केलं नवं घर, अक्षय्य तृतीयेनिमित्त पूजाही केली, कलाकारांकडून कौतुक अन्…

मुंबईत घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि हे स्वप्न प्रत्येकजण पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकार मंडळींपर्यंत प्रत्येकजण या स्वप्नपूर्तीच्या मागे असतो. गेल्या वर्षभरात तर अनेक कलाकार मंडळींनी नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केलेली पाहायला मिळाली. अक्षय केळकर, मंगेश देसाई, अश्विनी महांगडे, प्रसाद ओक, गिरीजा प्रभू, मयुरी वाघ या कलाकार मंडळींनी स्वतःच नाव घर घेत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. या कलाकारांपाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीने नवं घर घेतलं असल्याची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. (Aditi Dravid Baught New Home)

नवीन घर खरेदी केलेल्या कलाकारांच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं आहे. या अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे अदिती द्रविड. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अदितीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. अदितीने मुंबईत स्वतःच हक्काचं नवं घर घेतलं असल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे.

आणखी वाचा – अहिल्यादेवींच्या आयुष्यात होणार उलथापालथ, सूर्यकांत कदमच्या एन्ट्रीने मालिकेत येणार नवं वादळ, भरत जाधव यांची लक्षवेधी भूमिका

View this post on Instagram

A post shared by Aditi Vinayak Dravid (@aditi_vinayak_dravid)

इन्स्टाग्राम अकाउंटवरुन खास पोस्ट शेअर करत तिने घरची पहिली झलक चाहत्यांसह शेअर केली आहे. अदिती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने नव्या घराची झलक दाखवणारे काही फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये गृहप्रवेश पूजन आणि दुसऱ्या फोटोमध्ये नव्या घराचा खोली क्रमांक ८०१ असल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ATM मधून आल्या फाटलेल्या नोटा अन्…; ‘पारू’ फेम अभिनेत्रीचा संताप, फोटो शेअर करत म्हणाली, “बँक बदलण्याची…”

“फायनली आय सेड येस टू मुंबई…माझं स्वत:चं घर, स्वप्नपूर्ती!” असं कॅप्शन देत तिने हे खास फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. समीर परांजपे, सुकन्या मोने, समृद्धी केळकर, पूजा बिरारी, अभिजीत खांडकेकर, सावनी रविंद्र या कलाकारांनी पोस्टवर कमेंट्स करत अदितीला नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Aditi DravidAditi Dravid Baught New Homeaditi dravid homemarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
madhuri dixit on career break

लग्नानंतर आठ वर्ष अभिनयापासून दूर राहिली माधुरी दीक्षित, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, "मला मूल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.