शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पैसे कमावण्यासाठी अधिपतीचा कुस्ती खेळण्याचा निर्णय, अक्षराला नवऱ्याला साथ देणार का?, दोघांचंही बदलणार आयुष्य

Saurabh Moreby Saurabh More
जून 28, 2024 | 4:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada new promo Adhipati will be wrestling for money

पैसे कमावण्यासाठी अधिपतीचा कुस्ती खेळण्याचा निर्णय, अक्षराला नवऱ्याला साथ देणार का?, दोघांचंही बदलणार आयुष्य

झी मराठीवरची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिकाही प्रेक्षकांना आवडते आहे. या मालिकेतील अक्षरा आणि अधिपती यांचं नातं प्रेक्षकांना भावतं. आता ही मालिका एका नव्या वळणावर आली आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचं नातं बहरताना दिसत आहे. या दोघांमधली मैत्री आता हळूहळू घट्ट होत चालली आहे. काहीच दिवसांआधी अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अधिपतीवर आपलं प्रेम असल्याचं तिने मान्य केलं आहे. त्यामुळे अक्षरा आणि अधिपती या दोघांमधलं नातं आता बहरतं आहे. अशातच या दोघांमध्ये आता भुवनेश्वरी अडथळा आणत आहे.

भुवनेश्वरीने अधिपती-अक्षरा यांना सुर्यवंशी घराण्याच्या रितीनुसार, खऱ्या संसाराला सुरुवात व्हायच्या आधी नवरा-बायकोने अंगावरील कपड्याबरोबर दहा दिवस घराबाहेर राहायचं, सूर्यवंशी घराण्याची ओळख न सांगता सगळ्या अटी पाळून, एकमेकांची साथ न सोडता बाहेरच्या जगात नीट राहू शकले तर त्यांचा संसार सुखाचा होतो असं म्हणून घराबाहेर पडायला भाग पाडले. यानंतर अधिपती व अक्षरा यांनी त्यांच्या नव्या संसारालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिपती-अक्षरा यांच्या संसारासाठीचा आटापिटा सुरु आहे. पैशांसाठी ते काही ना काही प्रयत्न करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : आळंदी-देहू पोहोचताच वारकऱ्यांनी सेल्फीसाठी घेरलं, आदेश बांदेकरांनी दिलेली वागणूक पाहून सगळेच भारावले, अन्नदानही केलं अन्…

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका आता नव्या वळणावर आली आहे. याबद्दलचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. यांमध्ये अधिपती जास्त पैसे मिळण्यासाठी काहीतरी काम मिळालं पाहिजे असं बोलत असतानाच त्याला कुस्तीच्या शर्यतीचे पोस्टर दिसते. त्यावर स्पर्धा जिंकणाऱ्याला २५,००० बक्षीस असते. यावेळी आपण कामाबद्दल बोलत असतानाच देवाने मार्ग दाखवला असंही तो म्हणतो. त्यामुळे त्या पैशांसाठी अधिपती कुस्ती लढण्याचा निर्णय घेतो. यावर अक्षरा मात्र त्याला “तुम्हाला कुस्ती खेळायला जमणार आहे का?” असं विचारते.

आणखी वाचा – घटस्फोटानंतर पार्टी केली, थोडं रडणं झालं अन्…; सई ताम्हणकरचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “आम्ही एकमेकांबरोबर…”

त्यावर अधिपती कोल्हापूरची माती आहे. मी आखाड्यात उतरणार आणि कुस्ती खेळणार. अंबाबाईचा आशीर्वाद, तुमची साथ आणि डोक्यावर आईसाहेबांचा हात असताना कोणत्या पैलवानाली मी मातीत लोळवेन” त्यानंतर अधिपती या व्हिडीओमध्ये कुस्ती खेळत असल्याचेही पाहायला मिळत आहे. दरम्यान, अधिपती त्यांच्यातील ही केमिस्ट्री सध्या चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी त्यांच्या नव्या संसाराला सुरुवात  केली असून त्यांचा हा नवीन प्रवास चाहत्यांनाही भलताच आवडत आहे.  यात ते कितपत यशस्वी होतील? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.    

Tags: marathi entertainment newsMarathi Serial Newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Sai Tamhankar On Casting Couch

"तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल आणि…" त्या दिवसांमध्ये सई ताम्हणकरला वाईट अनुभव, म्हणाली, "एक मॅसेज आला तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.