सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल आणि…” त्या दिवसांमध्ये सई ताम्हणकरला वाईट अनुभव, म्हणाली, “एक मॅसेज आला तेव्हा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 28, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sai Tamhankar On Casting Couch

"तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल आणि…" त्या दिवसांमध्ये सई ताम्हणकरला वाईट अनुभव, म्हणाली, "एक मॅसेज आला तेव्हा…"

सिनेसृष्टीत काम करत असताना असे बरेच कलाकार आहेत ज्यांना कास्टिंग काऊचची शिकार व्हावं लागलं आहे. अनेकांनी त्यांच्या या कास्टिंग काऊचचा आलेल्या अनुभवांबाबत खुलेपणाने भाष्य केलं आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने कास्टिंग काऊचबाबत तिला आलेला अनुभव शेअर केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे अभिनेता सई ताम्हणकर. सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठीसह सईने हिंदी सिनेविश्वातही काम करत प्रेक्षकांचं मनं जिंकलं. सई सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Sai Tamhankar On Casting Couch)

आजवर सईने कोणताही वारसा हक्क नसताना स्वबळावर सिनेसृष्टीत स्वतःच असं स्थान निर्माण केलं. सांगलीसारख्या शहरातून मुंबईत आलेल्या सईने बरेच कष्ट केले आणि स्वतःच स्थान मिळवलं. मात्र सिनेसृष्टीत काम करतानाही सईला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. या सर्व गोष्टींवर मात करत सईने खूप मेहनत करत साऱ्यांचं मनं जिंकलं. नुकतीच सईने ‘Hauterrfly’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी सईने बऱ्याच गप्पा मारल्या आणि अनेक गोष्टींवर उघडपणे भाष्य केलं.

आणखी वाचा – घटस्फोटानंतर लग्नाची साडी टाकून न देण्याचा सई ताम्हणकरचा निर्णय, त्याचाच शिवला ड्रेस, म्हणाली, “हा ड्रेस खूप जास्त स्पेशल…”

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

कास्टिंग काऊचच्या अनुभवाबाबत या मुलाखतीदरम्यान सईला विचारण्यात आलं. तेव्हा यावर उत्तर देत ती म्हणाली, “खूप सुरुवातीला एक मॅसेज आला होता. तुमच्यासाठी हा रोल आहे पण तुम्हाला या लोकांबरोबर झोपावं लागेल. अशा शब्दांत त्याने मला मॅसेजवर सांगितलं. त्यावर मी त्याला सांगितलं, हा मॅसेज तू तुझ्या आईला पाठव. बाबांना पाठव. मला परत असा फोन किंवा मॅसेज करु नकोस. १५-२० वर्षात पहिल्यांदा अशा प्रकारचा मॅसेज आला, यापूर्वी आणि यानंतर परत असं कधीच झालं नाही. मॅसेज करणारी व्यक्ती कोण आहे, काय करते हे काही माहित नसताना ती व्यक्ती मॅसेजला माझ्यामते तितकं प्राधान्य नाही”.

आणखी वाचा – घटस्फोटानंतर पार्टी केली, थोडं रडणं झालं अन्…; सई ताम्हणकरचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “आम्ही एकमेकांबरोबर…”

सईने हा अनुभव शेअर करत एक प्रकारे तिच्या सडेतोड व बिनधास्त व्यक्तिमत्त्वाची झलक दाखविली. सई नेहमीच तिच्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसते. हटके व बोल्ड फोटोशूटमुळे ती नेहमीच चर्चेत असते,. यावरुन तिला अनेकदा ट्रोलही करण्यात आलं आहे.

Tags: entertainmentmarathi actresssai tamhankarSai Tamhankar On Casting Couch
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
29 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

कर्क व कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस लाभदायक, नोकरी-व्यवसायात होणार लाभ, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.