शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घटस्फोटानंतर पार्टी केली, थोडं रडणं झालं अन्…; सई ताम्हणकरचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, “आम्ही एकमेकांबरोबर…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 28, 2024 | 3:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Saie Tamhankar talk about her first divorce know more

घटस्फोटानंतर पार्टी केली, थोडं रडणं झालं अन्...; सई ताम्हणकरचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा, म्हणाली, "आम्ही एकमेकांबरोबर..."

मराठी, हिंदीसह इतर भाषांत ‘बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफुल’ अशी आपली वेगळी ओळख निर्माण करुन प्रेक्षकांच्या मनात घर केलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई ताम्हणकर तिच्या अभिनयामुळे जितकी चर्चेत असते. तितकीच ती तिच्या स्टायलिश फोटोंमुळेदेखील चर्चेत राहत असते. सई ही अनोख्या व वेगवेगळ्या स्टाईलमुळे जितकी चर्चेत राहत असते तितकीच अभिनेत्री तिच्या अनेक वक्तव्यांमुळेही चांगलीच चर्चेत असते. अशातच तिने नुकतीच ‘Hauterfly’ला मुलाखत दिली.

सईचं वैयक्तिक आयुष्यदेखील खूपच चर्चेत राहीलं आहे. सई ताम्हणकरने अमेय गोसावीबरोबर लग्नगाठ बांधली होती. सई व अमेयची एका मित्राच्या माध्यमातून मैत्री झाली आणि नंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं. मग २०१३ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण, त्यांचं हे प्रेम फार काळ टिकलं नाही. यानंतर अवघ्या दोन वर्षांनी २०१५ मध्ये सई व अमेय यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या या घटस्फोटाबद्दल तिने या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

याबद्दल बोलताना तिने असं म्हटलं की, “जेव्हा तुम्ही या गोष्टी करता तेव्हा तुम्ही खूप वेगळ्या शांततेत असता, जेव्हा तुम्ही त्या कागदपत्रावर कोर्टात सही करता. तेव्हा तिथे तुम्हाला तुमच्या नावाने मोठा आवाज देऊन बोलावले जाते. दोन्ही बाजूच्या लोकांचे आवाज देऊन बोलावले जाते. तिथे मला सई ताम्हणकर गोसावी म्हणून आवाज दिला गेला आणि लग्नानंतर तुम्ही घटस्फोट घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला तुमच्या लग्नानंतरच्या नावानेच बोलावले जाते”.  

आणखी वाचा – Video : मुग्धा वैशंपायनचं सासरकडचं घर आतून आहे असं, प्रवेश करताच दत्तगुरुंचं छोटं मंदिर, प्रसन्न वातावरण अन्…; व्हिडीओ व्हायरल

यापुढे तिने असं म्हटलं की, “त्यानंतर आम्ही पार्टीसाठी गेलो. मग तिथे थोडं रडणं वगैरे झालं. काही लोकांनी आयुष्याबद्दल धडे दिले. आमच्याबद्दल विचारले. त्यानंतर अगदी खास मित्रांनी आम्हाला फोन करत कुठे आहात?, कुठे आहात? असं विचारलं आणि असे एकेक करून आम्ही आठ-दहा जण जमले. मग आम्ही एकमेकांबरोबर खूप चांगला वेळ घालवला”.

आणखी वाचा – Video : आळंदी-देहू पोहोचताच वारकऱ्यांनी सेल्फीसाठी घेरलं, आदेश बांदेकरांनी दिलेली वागणूक पाहून सगळेच भारावले, अन्नदानही केलं अन्…

दरम्यान, सई ताम्हणकर लवकरच नागराज मंजुळेंच्या ‘मटका किंग’मध्ये दिसणार आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर या सीरिजचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. सई आणि नागराज पहिल्यांदाच या सीरिजसाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे या सीरिजमधील तिच्या भूमिकेसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  

Tags: marathi actressmarathi entertainment newssaie tamhankar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Bollywood casting meeting controversy
Entertainment

ऑडिशनला बोलावलं, चुकीचा स्पर्श केला आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, “त्याने अनेक महिलांना…”

एप्रिल 17, 2026 | 10:20 am
Next Post
Gaurav More On Maharashtrachi Hasyajatra

"एकच काम, काहीच नवीन सुचत नव्हतं अन्…", गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाला, "माझ्याकडून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.