झी मराठी वहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेत एकामागून एक येणाऱ्या वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. अधिपती व अक्षरा यांच्या संसारात विघ्न आणण्यासाठी भुवनेश्वरीने सरगम मॅडमला आणले आहे. अशातच मालिकेत नुकतच अधिपती व अक्षरा यांच्या प्रेमाचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. याबद्दलचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून या नवीन ट्विस्टबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
बऱ्याच दिवसांपासून अक्षरा व अधिपती प्रेमाची कबुली देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नेहमीच त्यांना काही ना काही अडथळे येताना दिसले. अशातच आता मालिकेत एक रंजक ट्विस्ट आला असून अखेर अक्षराने अधिपतीसमोर प्रेमाची कबुली दिली आहे. मराठमोळ्या अंदाजात हजेरी लावत आणि थेट कोल्हापुरी भाषेत अक्षराने अधिपतीसमोर प्रेम मान्य केलं आहे.
अशातच कालच्या भागात सरगम मॅडम भुवनेश्वरीला फोन करत अधिपतीला गाणं शिकवण्यासाठी येण्याचे विचारते. यावर भुवनेश्वरी अधिपतींना आता वेळ नाही. त्यामुळे त्याला गाणं शिकवण्यासाठी येता येणार नाही” असं म्हणते. मात्र हीच गोष्ट सरगम मॅडमला आवडलेली नाही. अधिपती-अक्षरा यांच्या संसारात विघ्न आणण्यासाठी भुवनेश्वरीने सरगम मॅडमला आणलं होतं. मात्र आता सरगम मॅडम अधिपतीच्या प्रेमात पडत आहे.
त्यामुळे मालिकेच्या पुढील भागांत सरगम मॅडम अधिपतीला तिच्या प्रेमात पाडण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे. मालिकेच्या आजच्या भागात अक्षरा कोल्हापुरी भाषेत तिचे अधिपतीविषयीचे प्रेम व्यक्त करणार असल्याचे पाहायला मिळणार असून दुसरीकडे सरगम मॅडमला अधिपतीचा पत्ता मिळाला असल्यामुळे त्यांना एकांतात भेटायला बोलवणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
सरगम मॅडम अधिपतीला एकांतात भेटायला बोलवणार असल्याची गोष्ट भुवनेश्वरीच्या बहिणीची म्हणजेच मुलगी म्हणजेच चंचला ऐकते. त्यामुळे आता मालिकेत एकीकडे अक्षरा व अधिपती यांचातील प्रेम बहरतानाचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सरगम मॅडम अधिपती व अक्षरा यांच्यात अडथळा आणणार आहे. त्यामुळे मालिकेच्या पुढील भागांसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.