गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लोकशाहीचा विजय झाला”, निवडणूकांच्या निकालांनंतर मराठी कलाकारांचं राजकीय मुद्द्यावर भाष्य, म्हणाले, “कुठलाही राजकीय पक्ष…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 5, 2024 | 2:22 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Lok Sabha Election 2024 result Aarya Ambekar, Tejaswini Pandit, Shashank Ketkar, Manjiri Oak, Renuka Shahane and Ketaki Chitale expressed their reactions

"लोकशाहीचा विजय झाला", निवडणूकांच्या निकालांनंतर मराठी कलाकारांचं राजकीय मुद्द्यावर भाष्य, म्हणाले, "कुठलाही राजकीय पक्ष..."

लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी नुकतीच संपली असून काल (४ जानेवारी) रोजी या निवडणुकांचा निकालही लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ५४३ लोकसभा जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू होती आणि याची काल, ४ जूनला मतमोजणीही पार पडली. भाजपाप्रणीत एनडीएने २९३ जागा जिंकल्या असून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने २३२ जागांवर विजय मिळवला आहे. याच निकालाबद्दल सामान्य नागरिकांसह मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी “राजकारण करा, पण कटकारस्थान, पक्ष फोडणे, ईडी व आयटीचा दूरुपयोग करु नका. खरे वाघ हे कोण ते कळलंच असेल. खरी श्रद्धा आणि श्रद्धेचा दिखावा यात खूप अंतर आहे. जनतेचा कौल विनम्रतेने स्वीकारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.” असं म्हणत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तर गायिका आर्या आंबेकरने “हा देश पुन्हा एकदा एका निस्वार्थी व जबाबदार व्यक्तीच्या हातात गेल्याबद्दल आनंद आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता प्रसाद ओकच्या पत्नीने या निकालावर “आज आपण काय शिकलो? Berger Paint धुळीला भिंतीवर टिकू देत नाही” अशी एक मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. तर प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनने “आज कुणीही जिंकलं असलं तरी विजय लोकशाहीचा झाला” असं म्हणत त्याचं मत व्यक्त केलं आहे. क्षितिजची ही पोस्ट अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने शेअर करत त्याला पाठींबा दिला आहे.

आणखी वाचा – बहीण असावी तर अशी! बहिणीने घावणे बनवत पूजा सावंतला सासरी पाठवला डब्बा, फोटोही केला शेअर, म्हणाली, “तुझे घावणे…”

तसेच अभिनेत्री केतकी चितळेनेही “आज लोकशाहीचा विजय झाला. कुठलाही राजकीय पक्ष नाही, पण लोकशाही जिंकली” अशी पोस्ट शेअर केली आहे. तसंच अभिनेता आशुतोष गोखलेनेही “लोकशाहीचा विजय” असं लिहित इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. तसंच अभिनेता शशांक केतकरने “कृपा करून आम्हाला जगायला सुरक्षित, प्रगत, स्वच्छ व आनंदी देश द्या” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘दुनियादारी’चं त्रिकुट ११ वर्षांनी पुन्हा एकत्र, स्वप्निल-सई-अंकुश यांचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, नाव काय असणार?

दरम्यान, देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार की नव्याने सत्तापालट होणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने जोरदार टक्कर दिली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला यंदा कमी जागांवर यश संपादन करता आलं आहे.

Tags: aarya ambekarLok Sabha Election 2024 Marathi Newsmarathi entertainment newsshashank ketkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Prabhakar more Shalu Video

Video : दुबईत पोहोचले 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरे, रस्त्यावरच 'शालू'वर केला भन्नाट डान्स, साधेपणाने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.