मराठी चित्रपटसृष्टीत अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. कुठे दोन भावांची जोडी, कुठे मित्र-मैत्रिणीची जोडी तर कुठे दोन बहिणींची जोडी. मराठी सिनेसृष्टीतही अनेक बहिणींची जोड्या प्रसिद्ध आहेत. या बहिणी कायमच सोशल मीडियाद्वारे त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात आणि या बहिणी म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत व तिची बहीण रुचिरा सावंत.
‘कलरफूल’ अभिनेत्री अशी ओळख असणारी पूजा सावंत काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली. २८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. मोठ्या थाटामाटात पूजा व सिद्धेशचा लग्नसोहळा पार पडला आणि पूजाच्या या लग्नसोहळ्यात अभिनेत्रीच्या बहिणीने म्हणजेच रुचिराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पूजाच्या लग्नात रुचिरा फारच हिरीरीने सर्व कार्यात सहभाग घेतला होता.

रुचिरा व पूजा सोशल मीडियावर फारच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे त्या एकमेकींबद्दलचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच रुचिराने नुकताच घरी घावण्यांचा खास बेत केला होता. यावेळी तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे पूजाला मेन्शन केले होते. तिच्या या स्टोरीवर पूजा सावंतने घावणे खाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि ही इच्छा अभिनेत्रीच्या बहिणीने पूर्णदेखील केली आहे.
याबद्दल पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. पूजाने रुचिराने दिलेल्या घावण्यांचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत बहिणीला “धन्यवाद” असं म्हटलं आहे. तसेच या स्टोरीद्वारे पूजाने “घावणे पोहोचले” असंही म्हटलं आहे.
दरम्यान, बहीण रुचिरा ही पूजाच्या लग्नात फारच उत्सुक होती. फार हिरीरीने ती लग्नाच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेत होती. रुचिरा व पूजा या दोन बहिणींचा खास बॉण्ड लग्नाच्या प्रत्येक कार्यात दिसून आला होता. हळदी समारंभ सोहळ्यात या दोघींनी एकमेकींबरोबर धमाल मजा मस्ती केली होती. एकमेकींनी ‘रसिकाच्या लग्नात’ या गाण्यावर छान ठेकाही धरला. त्याचबरोबर दोघी या गोड क्षणी भावुकही झाल्याचे पाहायला मिळाले होते.