मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बच्चन कुटुंबात सासू-सूनेची भांडणं, अमिताभ व जया बच्चन यांना लग्नाच्या वाढदिवसालाही दिल्या नाहीत शुभेच्छा, कौटुंबिक वाद चव्हाट्यावर?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 5, 2024 | 4:21 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amitabh Jaya Bachchan Wedding Anniversary

बच्चन कुटुंबात सासू-सूनेची भांडणं, अमिताभ व जया बच्चन यांना लग्नाच्या वाढदिवसालाही दिल्या नाहीत शुभेच्छा, कौटुंबिक वाद चव्हाट्यावर?

‘बिग बी’ अमिताभ बच्चन व जया बच्चन यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा ५१वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी बॉलिवूडच्या या पॉवर कपलवर शुभेच्छांचा वर्षावही केला. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमिताभ व जया यांचा लाडका मुलगा आणि सून अभिषेक-ऐश्वर्याने त्यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. यावरुन पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे की, बच्चन कुटुंबात पुन्हा संकट आलं आहे. तीन जून रोजी बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांच्या लग्नाला ५१ वर्षे पूर्ण झाली. मात्र, यावेळी बिग बींचा हा दिवस तितकासा खास नव्हता. (Amitabh Jaya Bachchan Wedding Anniversary)

खरं तर, दरवर्षी या जोडप्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी म्हणजेच जलसावर कार्यक्रम आयोजित केला जात होता. या खास प्रसंगी बिग बी त्यांच्या लग्नाशी संबंधित एखादा फोटो शेअर करायचे किंवा चाहत्यांना त्यांच्या लग्नाबाबतच्या आठवणी सांगायचे. पण अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कोणतीही पोस्ट शेअर न करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकंच नाही तर अभिषेक बच्चन त्याच्या आई-वडिलांना दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छाही देत ​​असे. तो सोशल मीडियावर आपल्या आई-वडिलांचे फोटोही शेअर करत असे. मात्र यावेळी अभिषेक बच्चनचे सोशल मीडिया अकाउंटवरही काहीही शेअर केले नाही.

आणखी वाचा – Video : दुबईत पोहोचले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे, रस्त्यावरच ‘शालू’वर केला भन्नाट डान्स, साधेपणाने वेधलं लक्ष

अमिताभ व जया यांची सून ऐश्वर्याने २०१८ साली सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एकदा शुभेच्छा दिल्या होत्या. त्यादरम्यान ऐश्वर्याने तिची मुलगी आराध्याचा अमिताभ व जयाबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आणि तिच्या सासू आणि सासऱ्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ऐश्वर्या नेहमीच तिचे सासरे अमिताभ बच्चन यांना तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते, तर ती तिच्या सासरच्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाही. यावरुन या अभिनेत्रीचे सासू जया बच्चन यांच्याबरोबरचे संबंध चांगले नसल्याचे दिसून येत आहे. ऐश्वर्या तिच्या पालकांच्या वाढदिवसाला निश्चितपणे पोस्ट करत असते. तर याउलट ती तिच्या सोशल अकाउंटवर तिच्या सासरची छायाचित्रे पोस्ट करत नाही.

आणखी वाचा – “किती ते अडाणी दाखवायचं”, आदित्याच्या नावाचं मंगळसूत्र न काढण्यावरुन पारूवर भडकले प्रेक्षक, म्हणाले, “एवढं नाटक…”

मात्र, गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबात सतत मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. अलीकडे लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यानही बच्चन कुटुंब एकमेकांपासून लांब राहिले. ऐश्वर्या तिला दुखापत झालेला हात घेऊन एकटीच मतदानासाठी आली होती. तिचा पती अभिषेकही तिच्याबरोबर दिसला नाही.
याआधी बच्चन परिवार नेहमी एकत्र येऊन मतदान करत असे. कान्स फेस्टिव्हल २०२४ मध्ये ऐश्वर्या मुलगी आराध्याबरोबरही दिसली होती. यावरुन ऐश्वर्या व अभिषेकचे लग्न मोडण्याच्या मार्गावर असल्याचेही अनेकांनी म्हटले. मात्र, या जोडप्याने यावर मौन बाळगले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, अमिताभ व जया यांनी त्यांचा प्रतीक्षा बंगला मुलगी श्वेता बच्चनला हस्तांतरित केल्यापासून बच्चन कुटुंब व सून ऐश्वर्या यांच्यात मतभेद सुरु झाले. हे सर्व मीडिया रिपोर्ट्स असले तरी सत्य काय आहे हे फक्त बच्चन कुटुंबालाच माहीत आहे.

Tags: aishwarya and abhishek bachchanAmitabh Jaya Bachchan Wedding Anniversarybollywood gossipentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
amrita singh on second marriage

घटस्फोटाच्या २० वर्षांनी सैफ अली खानची पहिली बायको करणार दुसरं लग्न?, म्हणालेल्या, "कधी काय होईल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.