शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मालिकेत अडाणी पण खऱ्या आयुष्यात उच्चशिक्षित, ‘तुला शिकवीन…’मधील अधिपतीचे शिक्षण किती? अभिनेत्यानेच दिली माहिती

Saurabh Moreby Saurabh More
जून 16, 2024 | 5:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula shikvin changlach dhada fame adhipati aka actor Hrishikesh Shelar talk about his education.

मालिकेत अडाणी पण खऱ्या आयुष्यात उच्चशिक्षित, ‘तुला शिकवीन...’मधील अधिपतीचे शिक्षण किती? अभिनेत्यानेच दिली माहिती

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. स्टारकास्ट आणि रंजक कथानकाच्या जोरावर या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. या मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी लगेच आपलंसं करून घेतलं. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. तर, अधिपतीच्या भूमिकेत अभिनेता ऋषिकेश शेलार झळकत आहे.

अक्षरा ही उच्चशिक्षित व एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असते. यामुळे अधिपती तिला मास्तरीणबाई अशी हाक मारत असतो. अक्षराचं लग्न मनाविरुद्ध अधिपतीशी होतं. परंतु, हळुहळू अधिपती स्वत:च्या चांगुलपणाने अक्षराचं मन जिंकून घेतो. मालिकेत अधिपती हा अशिक्षित व अडाणी दाखवला आहे, मात्र प्रत्यक्षात अधिपती हा उच्चशिक्षित आहे.

View this post on Instagram

A post shared by Shivani Rangole Kulkarni (@rangshivani)

‘फादर्स डे’निमित्त ‘इट्स मज्जा’ने अधिपती व चारूहास या बापलेकाबरोबर खास संवाद साधला. या संवादादरम्यान, अधिपतीने म्हणजेच अभिनेता हृषीकेश शेलारने त्याचे शिक्षण सांगितले. हृषीकेश शेलारने एम.बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे. हृषीकेश सांगलीमध्ये लहानाचा मोठा झाला. त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्याने लहानपणापासूनच बालनाट्यांमध्ये सहभाग घेत अभिनय केला.

आणखी वाचा – ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिजीत खांडकेकरने शेअर केल्या खास आठवणी, म्हणाला, “‘फादर्स डे’च्या निमित्ताने…”

हृषीकेशची आई सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणूण् कार्यरत आहे, तर वडील फार्मासिस्ट म्हणून काम करतात.  हृषीकेशला अभ्यासात फारशी गोडी नव्हती. मात्र त्याने आई-वडिलांच्या सांगण्यावरुन त्याचे एम.बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, मालिकेत अधिपतीने शिक्षण घेतले नसल्याचे दाखवले असले तरी खऱ्या आयुष्यात तो उच्च शिक्षित असल्याचे फार कमी जणांना माहीत आहे.

आणखी वाचा – प्रसाद ओकसाठी बायकोची ‘फादर्स डे’निमित्त खास पोस्ट, Unseen फोटो शेअर करत म्हणाली, “मुलांच्या डोळ्यात आदर व प्रेम…”

दरम्यान, अभिनयाच्या वेडापायी हृषीकेशने उच्च शिक्षण व चांगली नोकरी सोडून अभिनयाची वाट निवडली. त्याने अनेक मालिकांमधून काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील दौलत या भूमिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. त्यानंतर तो आता झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील त्याची अक्षराबरोबरची केमिस्ट्री सध्या चाहत्यांना विशेष आवडत आहे.

Tags: hrishikesh shelarmarathi entertainment newstula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
Next Post
शिवयोगामुळे सोमवारचा दिवस फायद्याचा, सिंह, तूळ व कुंभ राशीच्या लोकांना मिळणार खुशखबर, जाणून घ्या...

शिवयोगामुळे सोमवारचा दिवस फायद्याचा, सिंह, तूळ व कुंभ राशीच्या लोकांना मिळणार खुशखबर, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.