बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसाद ओकसाठी बायकोची ‘फादर्स डे’निमित्त खास पोस्ट, Unseen फोटो शेअर करत म्हणाली, “मुलांच्या डोळ्यात आदर व प्रेम…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 16, 2024 | 4:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Manjiri Oak shared a special post for Prasad Oak on the occasion of Father's Day.

प्रसाद ओकसाठी बायकोची ‘फादर्स डे’निमित्त खास पोस्ट, Unseen फोटो शेअर करत म्हणाली, “मुलांच्या डोळ्यात आदर व प्रेम...”

वडिलांचं प्रेम, वात्सल्य, त्याग व वेदना याची जाणीव ही प्रत्येक मुलाला असते. त्यामुळे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यंदाही जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी म्हणजेच आज ‘फादर्स डे’ साजरा केला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रत्येकजण आपल्या वडिलांबरोबर फोटो शेअर करत त्यांच्याविषयी भरभरून लिहित आहे. मराठी कलाकार मंडळींनीदेखील ‘फादर्स डे’ निमित्ताने वडिलांबद्दल खास पोस्ट शेअर करत आहे.

मंजिरी ओकनेही प्रसाद ओकबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे. फादर्स डेनिमित्ताने मंजिरीने प्रसादचे त्याच्या मुलांबरोबरचे खास फोटो शेअर केले असून खास पोस्टद्वारे तिने त्याला ‘फादर्स डे’च्या शुभेच्छाही दिल्या आहेत. यामध्ये मंजिरीने असं म्हटलं आहे की, “‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्यामागे एक स्त्री असते’ असं म्हणतात ना?. पण एका यशस्वी आईच्या मागे एक ‘मध्ये मध्ये न येणारा’ बाबा असतो. प्रसाद “तो” बाबा तू आहेस”.

View this post on Instagram

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

आणखी वाचा – “जे घडले ते…”, निखिल पटेलवर दलजीत कौरच्या मैत्रिणीचे गंभीर आरोप, म्हणाली, “या माणसाने तिच्यावर अन्याय…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “२-३ वर्षातून एकदाच पालक सभेला जाऊन, मुलांच्या तक्रारी ऐकल्यानंतर तिथून येताना मुलांना कबुतरांना दाणे खायला घालणारा बाबा आहेस तू, “बाबाला विचारून सांगते” असं माझ्या तोंडून ऐकल्यावर त्यावर भाबडेपणाने विश्वास ठेवणारा बाबा आहेस तू. अचानक अभ्यासाविषयी चौकशी करणारा आणि त्यावर स्वतःच हसणारा बाबा आहेस तू. घरात मंजूच बॉस आहे हे आपल्या आयुष्याच्या पहिल्या क्षणापासून स्वीकारणारा बाबा आहेस तू. अचानक कधीही मुलांना “ठीक आहेस ना” असं विचारणारा बाबा आहेस तू”.

आणखी वाचा – ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिजीत खांडकेकरने शेअर केल्या खास आठवणी, म्हणाला, “‘फादर्स डे’च्या निमित्ताने…”

यापुढे तिने “मुलांच्या वेगवेगळ्या वयात तुझ्या त्याच वयात राहिलेला बाबा आहेस तू. लहानपणी मुलांना आणलेली खेळणी त्यांच्याशीच भांडून खेळणारा बाबा आहेस तू आणि मोठे झाल्यावर त्यांचे नवे शूज त्यांना न सांगता हळूच घालून जाणारा बाबा आहेस तू. थोडक्यात काय, एका ‘गुणी आईच्या मुलांचा’ बाबा आहेस तू. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांच्या डोळ्यात ज्याच्याविषयी अत्यंत आदर व प्रेम असणारा बाबा आहेस तू.”

Tags: Day Postmanjiri oakmarathi entertainment newsprasad oak
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Next Post
Tula shikvin changlach dhada fame adhipati aka actor Hrishikesh Shelar talk about his education.

मालिकेत अडाणी पण खऱ्या आयुष्यात उच्चशिक्षित, ‘तुला शिकवीन...’मधील अधिपतीचे शिक्षण किती? अभिनेत्यानेच दिली माहिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.