Tula Shikvin Changalach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या भुवनेश्वरीचं खरं रुप सूर्यवंशी कुटुंबीयांसमोर आणण्यासाठी अक्षरा अनेक प्रयत्न करत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गेल्या काही महिन्यांपासून भुवनेश्वरी अधिपतीची खरी आई चारुलताचं रुप घेऊन सूर्यवंशींच्या घरी राहत होती. मात्र, अक्षराने वेळीच हुशारीने तिचं खरं रुप ओळखलं. यानंतर भुवनेश्वरी आणि चारुहासचं लग्न अक्षराने मोडलं, तसेच येत्या काळात अधिपतीसमोर काही केल्या त्याच्या भुवनेश्वरीचा खोटा चेहरा उघड करायचा असा निश्चय मास्तरीण बाईंनी केला आहे. (Tula Shikvin Changalach Dhada)
सासूचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी अक्षराला बजरंग मदत करणार असल्याचे कबूल करतो. मात्र ऐनवेळी तो पलटी मारतो. यामुळे अक्षरा तोंडावर पडते. हा सगळा प्रकार पाहून अधिपती संतापतो. तर, अक्षराला अश्रू अनावर होतात. दोघांच्या वादात भुवनेश्वरी उडी घेते. ती म्हणते, “सूनबाई आणि या घराला आम्ही इथे नको आहोत. त्यामुळे आम्हाला निघून जाऊदेत.” यावर अधिपती आईचे पाय धरतो आणि तिला घराबाहेर जाण्यापासून अडवतो. अशातच आता आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात अक्षराला घर सोडावं लागणार का? असा प्रश्न पडला आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार आई, परदेशात पार पडलं डोहळ जेवण, खास फोटो व्हायरल
या नवीन प्रोमोमध्ये दुर्गेश्वरी भुवनेश्वरीला असं म्हणते की, तिने (अक्षराने) तुमचं लग्न मोडलं आहे, त्यामुळे आता तुम्ही पण तिचं लग्न मोड. तिचं लग्न मोडल्याशिवाय तु गप्प राहू नकोस”. यांनानंतर अधिपती अक्षराला असं म्हणतो की, “अजून काही काळ आपण एकत्र राहिलो तर एकमेकांचा जीव घेऊ. कुणीतरी गेलं पाहिजे”. यावर अक्षरा त्याला “मीच घर सोडून जाते” असं म्हणते.
आणखी वाचा – रितेश देशमुखने दोन्ही लेकांसह सजवली ख्रिसमस ट्री, पत्नी जिनिलीयाने शेअर केला खास व्हिडीओ
त्यामुळे आता भुवनेश्वरीचा खरा चेहरा समोर आणण्याच्या प्रयत्नात अक्षराचा संसार मोडतोय की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तसंच अक्षरा या सगळ्या प्रकारानंतर घर सोडून जाणार का?,अधिपती अक्षराला अडवणार का? आणि अक्षराने घर सोडल्यावर चारुहास काय भूमिका घेणार? याचा उलगडा लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे.