मराठी मनोरंजन विश्वातून गेल्या काही वर्षांपासून गायब झालेली अभिनेत्री नेहा गद्रे लवकरत आई होणार आहे. स्टार प्रवाहच्या गाजलेल्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेतून ती लोकप्रिय झाली आणि घराघरात पोहोचली. नेहा लवकरच आई होणार असून, तिच्या प्रेग्नन्सीसंदर्भात ती विविध पोस्ट शेअर करत असते. अभिनेत्री सध्या ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आहे. नेहाने ऑस्ट्रेलियातील टंगलूमा बीचवर फोटोशूट करत ही गोड बातमी दिली होती. तिच्या या गोड बातमीवर चाहत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी तिचं अभिनंदन केलं होतं. अशातच आता अभिनेत्रीचे डोहाळ जेवण पार पडलं आहे. (Neha Gadre baby shower photo)
काही दिवसांपूर्वीच नेहाने ही आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. त्यानंतर आता नुकतंच तिचं डोहाळजेवण पार पडलं आहे आणि या डोहाळ जेवणाच्या सोहळ्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. लग्नानंतर अभिनय सोडून नेहा नवऱ्याबरोबर कायमची ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाली. हिरव्या रंगाची काठापदराची साडी, सुंदर दागदागिने या लूकमध्ये नेहा खूप सुंदर दिसत आहे. तर तिच्या नवऱ्याने पांढऱ्या रंदाचा कुर्ता पायजमा घातला आहे. त्याच्या कुर्त्यावर मोराचे सुंदर चित्र रेखाटलं आहे.
आणखी वाचा – Pushpa 2 प्रीमियरला जखमी झालेल्या मुलाची प्रकृती अजूनही गंभीर, काय म्हणाले डॉक्टर?
नेहा व तिच्या नवऱ्याचा हा फोटो अतिशय गोड दिसत आहे. दोघेही कौतुकाने बेबी बंपकडे पाहत आहेत आणि येणाऱ्या चिमुकल्या पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. नेहाने शेअर केलेल्या या फोटोला अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. तसंच एका चाहतीने तिला भारतात येऊन मालिकेत काम कधी करणार आहे?” असाही प्रश्न विचारला आहे. ५ वर्षांपूर्वी नेहाने ईशानबरोबर लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियातच स्थायिक झाली.
अभिनय क्षेत्र सोडून नेहा ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षिका म्हणून काम करत आहे. याशिवाय तिने डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन अँड केअर यामध्ये पदवी मिळवली. ज्याचा फायदा तिला शाळेत मुलांना शिकवताना होत आहे. ‘गडबड झाली’, ‘मोकळा श्वास’ या चित्रपटांमधूनही नेहाने प्रसिद्धी मिळवली. ‘गडबड झाली’ हा अभिनेत्रीचा शेवटचा चित्रपट होता.