रितेश आणि जिनिलीया देशमुख ही जोडी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहे. या जोडप्याचा मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. यामुळे या दोघांना महाराष्ट्राचे ‘दादा-वहिनी’ म्हणून ओळखलं जातं. जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले. जिनिलीया देशमुख ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती अनेक सणवारांनिमित्तही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. (Riteish Deshmukh decorating the Christmas tree)
देशमुखांच्या घरी सर्वच सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. जिनिलीयाने सासरी येऊन देशमुखांच्या परंपरा, मराठी संस्कृती आणि सण या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या आहेत आणि ती यांचे पालनही करते. तिने वटपौर्णिमा, गणेशोत्सव, नवरात्र, आषाढी एकादशी असे अनेक मराठी सण साजरे केले आहेत. जिनिलीया ही ख्रिश्चन धर्मातील असली तरी मराठी सण समारंभ ती मोठ्या आनंदाने साजरी करते. तसंच ती तिच्या धर्मातील सणांचे ही सेलिब्रेशन करते आणि यात तिला नवरा रितेशचीही उत्तम साथ मिळते.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार आई, परदेशात पार पडलं डोहळ जेवण, खास फोटो व्हायरल
अशातच रितेश-जिनिलीयाच्या घरी ख्रिसमस सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरु झाली आहे. यासाठी त्यांची दोन्ही मुलं ख्रिसमस ट्री सजवत असल्याचा व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा मोठा मुलगा आणि रितेश दोघे मिळून ख्रिसमस ट्रीच्या वरच्या बाजूने सजवत आहेत. तर, धाकटा मुलगा राहील ख्रिसमस ट्रीच्या खालील बाजूस सजावट करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे. “हळुहळू ख्रिसमस सेलिब्रेशनची सुरुवात होतेय” असं लिहित जिनिलीयाने हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, जिनिलीया व रितेश ही लोकप्रिय जोडी सध्या मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून दोघांनी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. त्याचवेळी दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघंही लग्नबंधनात अडकलेआणि आता त्यांना दोन मुळे आहेत.