शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर अक्षराने घेतला घर सोडण्याचा निर्णय, अधिपती बायकोला जाण्यापासून अडवणार का?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 15, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changalach Dhada Marathi serial update new twist that Akshara is going to leave the house

तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत मोठा ट्विस्ट, अक्षराने घेतला घर सोडून जाण्याचा निर्णय

Tula Shikvin Changalach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या भुवनेश्वरीचं खरं रुप सूर्यवंशी कुटुंबीयांसमोर आणण्यासाठी अक्षरा अनेक प्रयत्न करत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गेल्या काही महिन्यांपासून भुवनेश्वरी अधिपतीची खरी आई चारुलताचं रुप घेऊन सूर्यवंशींच्या घरी राहत होती. मात्र, अक्षराने वेळीच हुशारीने तिचं खरं रुप ओळखलं. यानंतर भुवनेश्वरी आणि चारुहासचं लग्न अक्षराने मोडलं, तसेच येत्या काळात अधिपतीसमोर काही केल्या त्याच्या भुवनेश्वरीचा खोटा चेहरा उघड करायचा असा निश्चय मास्तरीण बाईंनी केला आहे. (Tula Shikvin Changalach Dhada)

सासूचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी अक्षराला बजरंग मदत करणार असल्याचे कबूल करतो. मात्र ऐनवेळी तो पलटी मारतो. यामुळे अक्षरा तोंडावर पडते. हा सगळा प्रकार पाहून अधिपती संतापतो. तर, अक्षराला अश्रू अनावर होतात. दोघांच्या वादात भुवनेश्वरी उडी घेते. ती म्हणते, “सूनबाई आणि या घराला आम्ही इथे नको आहोत. त्यामुळे आम्हाला निघून जाऊदेत.” यावर अधिपती आईचे पाय धरतो आणि तिला घराबाहेर जाण्यापासून अडवतो. अशातच आता आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात अक्षराला घर सोडावं लागणार का? असा प्रश्न पडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार आई, परदेशात पार पडलं डोहळ जेवण, खास फोटो व्हायरल

या नवीन प्रोमोमध्ये दुर्गेश्वरी भुवनेश्वरीला असं म्हणते की, तिने (अक्षराने) तुमचं लग्न मोडलं आहे, त्यामुळे आता तुम्ही पण तिचं लग्न मोड. तिचं लग्न मोडल्याशिवाय तु गप्प राहू नकोस”. यांनानंतर अधिपती अक्षराला असं म्हणतो की, “अजून काही काळ आपण एकत्र राहिलो तर एकमेकांचा जीव घेऊ. कुणीतरी गेलं पाहिजे”. यावर अक्षरा त्याला “मीच घर सोडून जाते” असं म्हणते.

आणखी वाचा – रितेश देशमुखने दोन्ही लेकांसह सजवली ख्रिसमस ट्री, पत्नी जिनिलीयाने शेअर केला खास व्हिडीओ

त्यामुळे आता भुवनेश्वरीचा खरा चेहरा समोर आणण्याच्या प्रयत्नात अक्षराचा संसार मोडतोय की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तसंच अक्षरा या सगळ्या प्रकारानंतर घर सोडून जाणार का?,अधिपती अक्षराला अडवणार का? आणि अक्षराने घर सोडल्यावर चारुहास काय भूमिका घेणार? याचा उलगडा लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे.    

Tags: marathi serialTula shikvin Changalach DhadaTula Shikvin Changalach Dhada Serial Update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
16 December 2024 daily horoscope Monday is a day of financial gain for Aries, Leo and Cancer people

16 December Horoscope : मेष, सिंह व क्रर्क राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस आर्थिक लाभचा, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.