मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता झाला बाबा; लेकीचं नावही ठेवलं खास, म्हणाला…

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 5, 2025 | 2:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amol Naik Become Father

अभिनेत्याच्या घरी चिमूकलीचं आगमन

Amol Naik Become Father : ‘झी मराठी’ वाहिनीवरील सुपरहिट मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ जवळपास साडेचार वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. राणादा आणि पाठकबाई यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होत. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी मनापासून प्रेम दिलं आहे. मालिकेतील हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी साकारलेल्या मुख्य भूमिकांइतकंच प्रेम इतर कलाकारांनाही मिळालं. त्यातीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे अभिनेता अमोल नाईक, ज्याने मालिकेत राणादाच्या जिवलग मित्र बरकतची भूमिका साकारली होती.

राणादा आणि बरकत यांच्यातील मैत्री मालिकेतील खास आकर्षण ठरलं होतं. बरकतच्या साध्या, मनमिळाऊ स्वभावाने आणि हास्यास्पद संवादांनी त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. अभिनयाच्या जोरावर घराघरांत पोहोचलेल्या अमोल नाईकबद्दल एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे, आणि ती चाहत्यांमध्ये जलद गतीने व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : शुभमंगल सावधान! तेजस्विनी झाली सरवणकरांची सून; लग्नातील पहिला फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by Amol Ramchandra Naik (@amolnaik.cool)

अभिनेता अमोल नाईकच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. म्हणजेच अभिनेता अमोल नाईक पिता झाला आहे. ४ डिसेंबर २०२५ रोजी, म्हणजेच दत्त जयंतीच्या शुभदिनी त्याच्या घरी चिमुकलीच्या आगमनाने आनंदाचं वातावरण निर्माण झालं. हा आनंदाचा क्षण अमोलने स्वतः सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही सरप्राईज दिलं. पोस्ट शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले “मुलगी झाली हो… श्री स्वामी समर्थ”, आणि काही क्षणांतच या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

आणखी वाचा : “किती पैसे हवेत?” धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनावेळी सनी देओलची पापाराझींवर संतप्त प्रतिक्रिया; कॅमेरा खेचला अन्…

अमोल नाईकच्या या पोस्टवर त्याचा चाहत्यांनी, मित्रांनी आणि सहकलाकारांनी लाईक्स, कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी “बरकत बाबा झाला” अशी मजेशीर कमेंटही केली आहे. अमोल नाईकच्या आयुष्यातील हा सुंदर टप्पा चाहत्यांनी मनापासून साजरा केला आहे.

Tags: Amol Naik Become Fatherentertainment newsmarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Tejaswini Lonari Wedding

लाल भरजरी लेहेंगा, गोल्डन ज्वेलरी आणि…; लग्नात रिसेप्शन दरम्यान पतीसह तेजस्विनीची ग्रँड एंट्री, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.