शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : पार्टी सोडून रस्त्यालगतच्या दुकानामध्ये पाणीपुरी खायला आल्या धनश्री काडगावकर व दीपा परब, पाहा काय घडलं, व्हिडीओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 31, 2023 | 6:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dhanashri Kadgaonkar share a video with Deepa Parab

Video : पार्टी सोडून रस्त्यालगतच्या दुकानामध्ये पाणीपुरी खायला आल्या धनश्री काडगावकर व दीपा परब, पाहा काय घडलं, व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री धनश्री काडगावकरला मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणली जाते. धनश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलं. पण झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ‘वाहिनीसाहेब’ पात्रामुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली. सध्या ती याच वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ मालिकेत शिल्पी हे पात्र साकारताना दिसते. ती जरी यात नकारात्मक पात्र साकारत असली, तरी तिचं हे पात्र प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरलं आहे. धनश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती तिचे अनेक व्हिडीओज व फोटोज तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. धनश्रीने असाच एक व्हिडीओ नुकताच शेअर केला, जो चर्चेत आला आहे. (Dhanashri Kadgaonkar share a video with Deepa Parab)

मालिकेमध्ये धनश्री अनेकदा मुख्य नायिका अश्विनी (दीपा परब) विरोधात अनेक कटकारस्थान रचताना दिसते. पण, गेल्या काही भागांत दोघींमध्ये चांगला बॉण्ड असल्याचं पाहायला मिळत आहे. रिअल लाईफमध्येही या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या असून त्या सतत अनेक व्हिडीओ शेअर करतात. काही दिवसांपूर्वी दीपाने धनश्रीच्या मुलाला एक खास गिफ्ट दिलं होतं, ज्यावर तिने दीपाचे आभारही मानले होते. अशातच धनश्रीने दीपाबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला.

हे देखील वाचा – “…म्हणून मी लग्न केलं”, अभिजीत खांडेकरच्या बायकोचं नात्याबाबत पहिल्यांदाच खुलेपणाने भाष्य, म्हणाली, “लग्नानंतर प्रेम…”

View this post on Instagram

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri)

अभिनेत्री दीपा परब आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त अनेक कलाकार मंडळी दीपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री धनश्री काडगावकरनेही दीपाबरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दीपा व धनश्री एका दुकानात पाणीपुरी खाताना दिसल्या. “एका ठिकाणी आमच्या चॅनेलच्या पुरस्कार सोहळ्याचं नॉमिनेशन पार्टी सुरु आहे. पण आम्ही इतक्या वेड्या आहोत की, आम्ही ती पार्टी सोडून पाणीपुरी खायला आलो.”, असं ती या व्हिडीओमध्ये म्हणाली. तर पुढे दीपा धनश्रीला पाणीपुरी भरवताना दिसली. तिने या व्हिडीओला कॅप्शन देत म्हणाली, “Happy birthday pani puri lover दीपा परब”.

हे देखील वाचा – थाटामाटात लग्न, आठ वर्षांनी घटस्फोट अन्…; इमरान खान आता विवाहित अभिनेत्रीला करतोय डेट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

धनश्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यावर अश्विनी म्हणजे दीपानेही रिप्लाय देत तिचे आभार मानले. तसेच, चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत दीपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: deepa parabdhanashri kadgaonkarDhanashri Kadgaonkar share a video with Deepa ParabTu Chal Pudhzee marathi
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Vanita Kharat surprised her husband on his birthday

एकमेकांना किस केलं, निवांत क्षण अन्…; वनिता खरातने नवऱ्याला दिलं खास सरप्राइज, म्हणाला, “तू मला…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.