शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

थाटामाटात लग्न, आठ वर्षांनी घटस्फोट अन्…; इमरान खान आता विवाहित अभिनेत्रीला करतोय डेट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 31, 2023 | 5:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Imran Khan spotted with Lekha Washington

थाटामाटात लग्न, आठ वर्षांनी घटस्फोट अन्…; इमरान खान आता विवाहित अभिनेत्रीला करतोय डेट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेता व आमिर खानचा भाचा असलेला इमरान खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून लांब आहे. २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या इमरानने अनेक चित्रपटांत काम केले. नंतर, त्याच्या बऱ्याच चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मोठं अपयश मिळाले. तो बराच काळ बॉलिवूडपासून लांब राहिला. २०११ मध्ये इमरानने अवंतिका मलिकशी लग्न केलं. मात्र काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद झाले, ज्यामुळे २०१९ मध्ये ते विभक्त झाले. अशातच, घटस्फोटानंतर इमरानच्या आयुष्यात आता एका अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचे समोर आलं आहे. (Imran Khan spotted with Lekha Washington)

अभिनेत्री कृति खरबंदा हिच्या बर्थडे पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी तो त्याची कथित गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनबरोबर एकत्र स्पॉट झाला. नुकतेच या पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले. ज्यामध्ये इमरान आणि लेखा उपस्थित पापाराझींना स्मित हास्य करत पोझ देत आहे. काळ्या रंगाचा टी-शर्ट, राखाडी रंगाची पँट आणि स्निकर्स असा पेहराव इमरानने केला होता. तर लेखाने फ्लोअर गाऊन परिधान केला होता. दोघेही अतिशय सुंदर दिसत असून यावेळी या जोडीला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

हे देखील वाचा – Bigg Boss 17 : “स्विमिंग पूलमध्ये मस्ती, हातावर किस अन्…”, अभिषेक कुमार व खानजादीमध्ये जवळीक, ईशा मालवीयचा जळफळाट

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

दरम्यान, याआधीही हे दोघे विविध ठिकाणी एकत्र फिरताना दिसले आहे. दोघांनी ‘मटरू की बिजली का मन डोला’ या चित्रपटात एकत्र काम केलेलं असून गेली अनेक वर्ष हे दोघे एकमेकांना डेट करत आहे. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार असा दावा केला जातं की, लेखाबरोबरच्या अफेअरमुळे इमरान आणि अवंतिकाचं घटस्फोट झाला आहे. इमरानची कथित गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टन दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री असून तीदेखील विवाहित आहे.

हे देखील वाचा – “झोपून घे बाई…”, सई लोकूरच्या व्हिडीओवर क्रांती रेडकरची कमेंट, म्हणाली, “तुला व तुझ्या येणाऱ्या बाळाला…”

इमरानने ‘किडनॅप’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘डेल्ही बेल्ली’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. २०१५ मध्ये तो ‘कट्टी बट्टी’ चित्रपटात शेवटचा दिसला होता. त्यानंतर मात्र त्याच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारसा यश मिळालं नाही. ज्यामुळे त्याने ही इंडस्ट्री सोडली. दरम्यान, या जोडीचे फोटोज व्हायरल होताच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली.

Tags: bollywood newsimran khanImran Khan spotted with Lekha Washingtonlekha washington
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
appi baby shower in zee Marathi award

पेढा की बर्फी?, ‘झी मराठी’च्या मंचावर अप्पीच्या डोहाळे जेवणाचा थाट, पाहा खास फोटो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.