मराठी प्रेक्षकांना खळखवून हसवणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलाकार अनेक कलाकार प्रकाशझोतात आले. यामुळे प्रत्येक कलाकाराला एक वेगळी ओळख मिळाली. त्यापैकी एक कलाकार म्हणजे श्याम राजपूत. श्याम राजपूत यांना खानदेशचा हिरा म्हणूनही संबोधतात. आपला हजरजबाबीपणा,संवादाचे अचूक टायमिंग व बोलण्यातील खानदेशी लहेजा यामुळे ते खूप प्रसिद्ध झाले. (actor shyam rajput )
मराठीमध्ये अनेक चित्रपट, मालिका व सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून अनेक विनोदी स्किट सादर केले आहेत.या स्किटमध्ये अनेकदा त्यांनी खानदेशी भाषेचा वापरही केला आहे. त्यांच्या खानदेशी भाषेच्या गोडव्यामुळे प्रेक्षकांना ते अधिक आपलेसे वाटतात. नुकतेच श्याम यांनी ‘इट्स मज्जा’ ला दिलेल्या ‘मज्जाचा अड्डा’या कार्यक्रमामध्ये खानदेशी भाषेतून स्किट सादर करण्याबद्दल भाष्य केले आहे.
या कार्यक्रमामध्ये श्याम यांना विचारण्यात आले की, “तुम्ही स्किट सादर करताना सतत खानदेशी भाषेमधून सादरीकरण करता, तर तुम्हाला त्याव्यतिरिक्त वेगळे काही करावे असे वाटते का?”, त्यावर श्याम यांनी उत्तर दिले की, “कधी कधी मला वाटतं की वेगळं काही करावं पण आमचे सर म्हणतात की, प्रत्येकाचे एक वेगळे वैशिष्ट्य असतं. आठवड्यातून दोन दिवस स्किट सादर करायचे असते. त्यातील सात ते आठ मिनिटं तुला सादरीकरण करावं लागत. त्यामध्ये जर खानदेशी बोलायचे असेल तर केवळ ते मीच सादर करत असतो. खानदेशी भाषेत बोलणाऱ्यांचं प्रमाण इथे खूप कमी आहे. त्यामुळे ते म्हणतात की, तुझं वैशिष्ट्य तुला जपलं पाहिजे. त्यामध्येच अजून वेगळेपणा आणता येईल का? काही नवीन करता येईल का? असा विचार कर असं वरिष्ठ सांगतात. वेगळ्या भूमिकेचं म्हणाल तर मी कधी मालेगांवचे एक पात्र करतो, फिरोज खानचे पात्र मला मिळते. कधी कधी इच्छा असेल तर मी माझी प्रमाणभाषा वापरतो,” असंही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमानंतर कुठे गायब झाला सागर कारंडे?, अभिनेता आता काय करतो?
त्यानंतर विचारले गेले की, “तुम्ही हास्यजत्रेमध्ये खानदेशी पात्र रंगवता त्यावेळी तुम्हाला तुमच्या गावाकडील लोकांचा काय अनुभव येतो?”, त्यावर श्याम म्हणाले की, “तिकडच्या लोकांना एक वेगळाच अभिमान आहे. ते अहिराणी भाषेमध्ये माझं कौतुकही करतात. एक जण म्हणाले की तुम्ही खानदेशात राहता त्याचा अभिमान आहे. पण मी म्हणालो की मी आहे खानदेशचा आहे पण मी राहतो छत्रपती संभाजी नगर यथे. त्यावर त्यांना राग आला आणि म्हणाले नाही तरीही तुम्ही खानदेशचेच!. तसेच ते पुढे म्हणाले की,,“मजेशीर किस्सा म्हणजे मी जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा ते मला म्हणतात की आम्हीही खानदेशी भाषेत बोलतो तर आम्हालाही त्या क्षेत्रात काम मिळवून द्यावे असंही ते म्हणतात यामध्ये निवृत्त लोकांचाही समावेश असतो”.
त्यानंतर त्यांना विचारण्यात आले की, “तुम्ही जेव्हा बस किंवा लोकल ट्रेनने प्रवास करता तेव्हा कोणते अनुभव तुम्हाला येतात?’, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, “मी एकदा बसने प्रवास करत असताना एक प्रवासी भेटला. तो मला विचारलं की,तुम्ही ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’मधल्या श्याम राजपूतसारखे दिसता. त्यावर मी काहीच उत्तर दिले नाही. ती व्यक्ती पुन्हा म्हणाली की तुम्ही अगदी त्यांच्यासारखेच दिसता. तेव्हा मी म्हणालो की हो मी तोच आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली की तुम्ही बसमध्ये कसे काय? त्यावर वर त्यांनी उत्तर दिले की मी बसने देखील प्रवास करतो”, असे प्रेक्षकांचे अनेक अनुभव ‘मज्जाचा अड्डा’वर बोलताना सांगितले आहेत.