मालिका, चित्रपटांच्या दुनियेनंतर आता प्रेक्षकांनी आपली पावले वेबसीरिज कडे वळविली आहेत. प्रेक्षकही या वेब सीरिजला भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. अशातच ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजचा तिसरा भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अशातच तिसऱ्या सीझनच्या या टीझरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या टीझरमधील लक्षणीय बाब म्हणजे डायलॉग्स.(City Of Dreams Teaser)
सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरिजचा टिझर राजकीय स्थितीबाबत भाष्य करताना दिसत आहे. सध्या हा टिझर चर्चेत असून राज्याच्या राजकारणाचा नुसता खेळ बनवलाय, प्रत्येक जण पार्टी बदलतोय, तुमचा साहेब अजून रिटायर झालेला नाही, सत्तेसाठी अंतिम लढा, मी पार्टी सोडत नाही तोडतो, असे दमदार डायलॉग या सीरिजच्या टीझरमध्ये पाहायला मिळणार आहे. या डायलॉग्स मुळेच यंदाचा हा सिझन चर्चेत असल्याचं दिसतंय. सध्याची खरी राजकीय स्थितीही हलाखीची असून, कोण कोणाच्या पार्टीत दिसतोय कोण केव्हा पार्टी सोडून जात आहे असं काहीस चित्र दिसतंय. अशातच आलेल्या या धडाकेबाज ट्रेलरला प्रेक्षक ही भरभरून प्रतिसाद देतील यांत वाद नाही.
पहा सिटी ऑफ ड्रीम्स टीझरच गुपित (City Of Dreams Teaser)
राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. वडील आणि मुलीमधील सत्तेसाठीचा संघर्ष या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. कारण या वेब सीरिजचे आधीच दोन्ही सिझन चांगलेच गाजले होते. त्यानंतर प्रेक्षक या सीझनच्या तिसऱ्या पर्वासाठी उत्सुक आहेत. अशातच या वेब सीरिजच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.(City Of Dreams Teaser)
नागेश कुकुनूर दिग्दर्शित या सीरिजमध्ये अतुल कुलकर्णी, प्रिया बापट आणि सचिन पिळगावकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा जिथे शेवट होतो तिथूनच तिसऱ्या सीझनची सुरुवात होताना दिसणार आहे. या सीझनमध्ये अमेयराव गायकवाड झळकणार आहे. या सिरीजमध्ये तो पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. अमेयराव गायकवाडचा अनोखा अंदाज या सीरिजमध्ये पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.