‘क्या हार मे क्या जीत मे, किंचित नहीं भयभीत मे’ या अटल बिहारी वाजपेयी यांनी लिहिलेल्या ओळी लागू पडतात ते अभिनेते मनोज बाजपेयी यांच्यासाठी. कलाकार कितीही प्रसिद्ध झाला तरीही एक गोष्ट तो कधीच विसरत नाही ती म्हणजे त्याच्या आयुष्यात त्याने उपभोगलेला स्ट्रगल. अगदी आज कितीही मानधन घेत असले, कितीही चित्रपट, मालिका गाजवलेले बहुगुणी कलाकार असले तरीही त्यांच्या प्रवासातील ही मेहनतीची आठवण असलेली शिदोरी कायम त्यांना प्रोत्साहित करत असते. स्ट्रगल स्टोरी या इट्स मज्जाच्या स्पेशल भागात आज थोडक्यात जाणून घेऊयात लोकप्रिय अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या आयुष्यतील स्ट्रगल बद्दल.(Struggle Story of Manoj Bajpayee)
१९९८ मध्ये प्रदर्शित झालेला राम गोपाल वर्मा यांचा सत्या चित्रपट तुम्हाला माहितीचं असेल.या चित्रपटातील भिकू म्हात्रे ही भूमिका चांगलीच गाजली आणि ही भूमिका साकारली होती गावाकडून शहरात काम मिळवण्यासाठी आलेले आणि आज या मनोरंजनविश्वात एक मानाचं स्थान मिळवलेले अभिनेते मनोज बाजपेयी. मनोज बाजपेयी हे नाव आज जितक्या अभिमानानं घेतलं जात त्या मागे असणारी गोष्ट देखील तितकीच खुमासदार आहे.
१० किलोमीटर चालत जायचो कारण…
ऐका मुलाखतीत त्यांनी त्याच्या या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं एक काळ असा होता ज्यावेळी त्यांना आज खायला भेटलं तर उद्या काय करायचं काय खायचं याची काही कल्पना नसायची, कित्येकदा नाटकाच्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतंही वाहन नसायचं त्यावेळी १० १० किलोमीटर पर्यंतचा प्रवास पायी करून जावं लागायचं पण तेव्हा ही त्यांच्यामानात आपल्याला उद्या कोणता सीन करण्याचा आहे, नाटकात आपले सवांद काय आहेत याच गोष्टी असायच्या. पायी चालत जात असताना ते इंग्रजी सुधारावं या साठी ती वाक्य बोलत जायचे आणि त्यामुळे कधी कधी लोक कोण वेडा चाललंय असं देखील त्यांना म्हणायचे.
अनेक प्रोडक्शन हाऊस मधून हाकललं…(Struggle Story of Manoj Bajpayee)
पुढे सांगताना मनोज म्हणाले कि सुरुवातीला काम मागायला गेलो कि अनेक प्रोडक्शन हाऊस मधून आम्हाला हाकललं गेलं. कामासाठी खूप भटकायचो. अनेक निर्माते, दिगदर्शक सुद्धा शिव्या देऊन आम्हला हाकलून द्याचे. इतका अपमान होऊन ही कधी काम करण्याची इच्छा संपली नाही असं देखील मनोज जी मुलाखतीत म्हणाले. सुरुवातीला अनेक ठिकाणी छोटा मोठं काम करून मी काम करत गेलो स्वतःला सिद्ध करत गेलो आणि अशी काम करत करतच मला बॅन्डेट queen हा चित्रपट मला मिळाला असं मनोज म्हणाले.
५ वर्षांनी मिळाला ‘ भिकू म्हात्रे….’
सत्या हा चित्रपट गाजण्यामागे आणखी एक कारण होत ते म्हणजे या चित्रपटात मनोज वाजपेयी यांनी साकारलेली भिकू म्हात्रे ही भूमिका. परेश रावल यांच्या एका चित्रपटात सहाय्यकाची भूमिका म्हणून मनोज यांना रोल मिळाला होता त्या निम्मित मनोज आणि राम गोपाल वर्मा यांची भेट झाली आणि जेव्हा राम गोपाल वर्मा यांना समजलं कि सत्या मध्ये काम केलेला करालंकार हाच आहे तेव्हा ते उठून उभे राहिले आणि त्यांनी मनोज यांना विचारलं कुठे होता तू गेले पाच वर्ष मी तुला शोधतोय आणि त्यांनी सत्या मधील या भूमिकेसाठी मला निवडलं .
अनेक चित्रपटांमधून तसेच फॅमिली मॅन, गँग्स ऑफ वास्सेपूर अशा अनेक लोकप्रिय वेब सिरीज मधून मनोज यांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.