शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बहिणीची काळजी घे”, तितीक्षा तावडेच्या भावाने सिद्धार्थ बोडकेचा पिळला कान, अभिनेता उत्तर देत म्हणाला, “ओके ओके मी…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 27, 2024 | 5:55 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Titeeksha Tawde shared special pictures in her wedding with her brother

"बहिणीची काळजी घे", तितीक्षा तावडेच्या भावाने सिद्धार्थ बोडकेचा पिळला कान, अभिनेता उत्तर देत म्हणाला, "ओके ओके मी..."

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला आणि हाअ मोठा बदल म्हणजे तितीक्षाचं लग्न. अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर तितीक्षाने विवाहगाठ बांधली आहे. तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अगदी शाही थाटामाटात तितीक्षा व सिद्धार्थ लग्नबंधनात अडकले आहेत. 

लग्नासाठी तितीक्षा व सिद्धार्थने खास लूक केला असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी तितीक्षाने ऑफ व्हाईट रंगाची नऊवारी साडी नेसली होती, तर या साडीला साजेसा असा पिवळ्या रंगाचा डिझाइनर ब्लाऊजही परिधान केला होता. तर सिद्धार्थने तितीक्षाच्या लूकला साजेसा असा ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता व त्यावर धोतर परिधान केला होता. त्यांचा हा खास लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडला. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by जेठाजी (@saishtawde)

आणखी वाचा – “प्रत्येकाची दोन दोन लफडी आणि…”, आशुतोषच्या जाण्याने खचली अरुंधती, पोस्ट शेअर केल्यानंतर भडकले प्रेक्षक, म्हणाले, “मालिका बघणारेही…”

अशातच आता तिच्या लग्नातील आणखी एका खास क्षणाचा फोटो व्हायरल होत आहे आणि हा फोटो म्हणजे तितीक्षाच्या लग्नातील कानपिळीचा. तितीक्षाच्या लग्नात तिच्या भावाने सिद्धार्थचे कान पिळले आणि त्याचा हा खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ-तितीक्षा यांच्या चेहऱ्यावर मनमोहक हसू दिसत आहे. तर तितीक्षाचा भाऊहे या खास फोटोमध्ये हसताना दिसत आहे. साईष तावडे असं तिच्या भावाचं नाव आहे.

आणखी वाचा – अदिती राव हैदरीने सुप्रसिद्ध अभिनेत्याशी गुपचूप उरकलं लग्न, दोघांचंही झालं होतं पहिलं लग्न, घटस्फोट झाला अन्…

“माझ्या बहिणीची काळजी घ्या” असं म्हणत तितीक्षाच्या भावाने हे खास फोटो शेअर केले आहेत.  दरम्यान, लग्नाआधी तिच्या भावाने अगदी थाटात दोघांचे केळवणदेखील पार पाडले होते. त्यावेळीही त्यांच्या केळवणाचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता या नवीन फोटोलाही सोशल मीडियावर तूफान प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या फोटोवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.    

Tags: marathi actressmarathi entertainment newstiteeksha tawde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
farah khan on shahrukh khan

मुलांना जन्म दिल्यानंतर शाहरुख खान रुग्णालयामध्ये बघायला आला अन्…; फराह खानने सांगितला प्रेग्नंसीचा 'तो' प्रसंग, म्हणाली, "हाताला सलाईन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.