छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेचे रहस्यमय कथानक व त्यात येणाऱ्या अनेक वळणांमुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंतीस उतरली. शिवाय, नेत्राला दिसणारा भूतकाळ आणि त्यापुढे घडणाऱ्या अनेक घटना प्रेक्षकांना पाहायला नेहमीच रंजक वाटतात. मालिकेत नेत्राच्या तत्त्वांमागचं रहस्य लवकरच उलगडणार असून गेल्या काही भागांमध्ये पंचपिटिका रहस्यांचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेचा जंगलातील शूटचा BTS व्हिडीओ समोर आला होता. आता याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला, ज्याची सध्या चर्चा होत आहे. (Satvya Mulichi Satvi Mulgi BTS Video)
मालिकेच्या मागच्या भागांमध्ये प्रेक्षकांना असं पाहायला मिळतं की, नेत्रा आणि इंद्राणी पंचपिटिका पेटीच्या शोधात गेल्या आहे. ज्यात त्यांना आतापर्यंत दोन पेट्या मिळाल्या असून रुपालीला या गोष्टीचा राग येतो. त्यामुळे ती तिसरी पेटी त्या दोघींच्या हाती लागू नये, यासाठी ती अनेक प्रयत्न करत आहे. या पंचपिटिकेची पहिली पेटी इंद्राणीच्या रक्ताने उघडली जाते. तर दुसरी पेटी एका स्मशानभूमीतून मिळते.
हे देखील वाचा – Video : पुन्हा एकदा सुप्रिया पाठारेंच्या हॉटेलला टाळं, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण, म्हणाल्या, “काही दिवसांसाठी…”
जेव्हा मालिका रोमांचक वळणावर येत आहे. तेव्हा हा सीन चांगला व्हावा, तासाठी कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. असाच एक सीन करतानाचा व्हिडीओ नेत्रा म्हणजे अभिनेत्री तितिक्षा तावडेने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघी या सीनची तयारी करताना दिसत आहे. समोर आलेल्या या BTS व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर इंद्राणी म्हणजे अभिनेत्री श्वेता मेहेंदळेदेखील दिसत आहे. या व्हिडीओत नेत्रा व इंद्राणी एका कारमध्ये बसलेल्या असून त्यांची ही कार यावेळी हलताना दिसत आहे. दोघींच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत असून यावेळी त्या एकमेकींशी संवाद साधत आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये पडद्यामागील तंत्रज्ञाची नेहनात पाहायला मिळत आहे. तितिक्षाने या व्हिडिओला “अशाप्रकारे या चालत्या कारचा सीन शूट होतो.”, असं कॅप्शन दिलं आहे.
हे देखील वाचा – Video : साधंच घर, नातेवाईकांची गर्दी अन्…; नवऱ्यासह सासरी पोहोचली क्रांती रेडकर, साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक, व्हिडीओ व्हायरल
तितिक्षाची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. तसेच, मालिकेतील सहकलाकार ऐश्वर्या नारकर व अमृता रावराणे यांनीही या व्हिडीओवर गमतीशीर कमेंट केली आहे. दरम्यान, या दोन पेटीच्या रहस्यानंतर नेत्रा व इंद्राणी तिसऱ्या पेटीचा शोध घेणार आहे. पुढे यात आणखी काय पाहायला मिळणार? या पेटींमधून कोणतं रहस्य उलगडणार? याबाबत चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.