शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : पुन्हा एकदा सुप्रिया पाठारेंच्या हॉटेलला टाळं, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण, म्हणाल्या, “काही दिवसांसाठी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 17, 2023 | 2:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Supriya Pathare Hotel

Video : पुन्हा एकदा सुप्रिया पाठारेंच्या हॉटेलला टाळं, व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण, म्हणाल्या, “काही दिवसांसाठी…”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. आजवर सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलंच आहे. एक अभिनेत्री म्हणून त्या लोकप्रिय आहेतच याशिवाय त्या एक उत्तम व्यवसायिकाही आहेत. सुप्रिया पाठारे यांच्या लेकाने आणि त्यांनी मिळून व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला फूड ट्र्क पासून सुरु केलेल्या या व्यवसायाने हॉटेल पर्यंत धाव घेतली आहे. लेकाने व आईने पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. (Supriya Pathare Hotel)

ठाणे येथे त्यांनी ‘मharaj’ पावभाजी आणि फास्ट फूड कॉर्नर हे हॉटेल सुरु केलं आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी त्यांच्या या हॉटेलला भेट देत असतात. दरम्यान त्यांच्या या हॉटेलमध्ये कलाकारमंडळी पदार्थांचा आस्वाद घेतानाचे अनेक फोटोही सोशल मीडियावरून पोस्ट करण्यात आले आहेत. मध्यंतरी सुप्रिया पाठारे यांच्या हॉटेलला घेऊन बऱ्याच अफवा पसरल्या होत्या. मात्र त्यावेळी सुप्रिया यांनी स्पष्टीकरण देत या विषयावर भाष्य केलं होतं.

आणखी वाचा – “त्यांनी मला मारलं आणि…”, नाना पाटेकरांचा मार खालेल्या मुलाची पहिली प्रतिक्रिया, आरोप करत म्हणाला, “त्यांच्याजवळ जाताच…”

आता सुप्रिया पाठारे यांनी शेअर केलेली इंस्टाग्राम पोस्ट सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सुप्रिया यांनी त्यांचं हॉटेल काही काळ बंद केलं असल्याचं सांगितलं आहे. इंस्टाग्रामवरून हॉटेलचा एक व्हिडीओ पोस्ट करत त्याखाली कॅप्शन देत सुप्रिया यांनी असं म्हटलं आहे की, “काही अडचणींमुळे महाराज आपलं बंद आहे, लवकरच खवय्यांसाठी हजर होऊ,स्वामी चरणी हीच प्रार्थना, भेटूया लवकरच”. यावरून काही काळ सुप्रिया पाठारे यांचं हॉटेल बंद असणार असल्याची माहिती त्यांनी चाहत्यांसह शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Supriya Pathare (@supriya_pathare75)

आणखी वाचा – Video : साधंच घर, नातेवाईकांची गर्दी अन्…; नवऱ्यासह सासरी पोहोचली क्रांती रेडकर, साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक, व्हिडीओ व्हायरल

मध्यंतरी ही हॉटेल बंद होणार असल्याच्या अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या. यावर सुप्रिया पाठारे यांनी स्पष्टीकरण देत व्हिडीओ शेअर केला. यावर स्पष्टीकरण देत सुप्रिया म्हणाल्या, “तुम्हा सगळ्यांना माहित आहे आपलं ‘महाराज’ हॉटेल केवडा सर्कल, रामजी हॉटेल समोर ठाणे येथे आहे. या हॉटेलमध्ये पावभाजी स्पेशल मिळते. तुम्ही सगळ्यांनी येऊन आस्वादही घेतला आहे हे आम्हा सर्वांनाच माहित आहे. बऱ्याचश्या गोष्टी आमच्या कानावर आल्या, फोनही आले की, त्यांना असं कळलं हे हॉटेल बंद झालं आहे, बऱ्याच जणांना असं सांगण्यात आलं. पण असं काहीच नाही आहे. २१ तारखेला माझी आई गेली. त्यामुळे आम्ही हॉटेल बंद ठेवलं होत. आता काल तिचं कार्य झालं. आणि त्यातून जरा मोकळे होत, व्यवसाय आहे तो सुरूच ठेवायला हवा म्हणून आजपासून हे हॉटेल खवय्यांसाठी सुरु करतोय. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, महाराज हॉटेलला नक्की येऊन पावभाजीचा आस्वाद घ्या.”

Tags: entertainmentmaharaj hotelmarathi actresssupriya patharesupriya pathare hotel
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Next Post
Satvya Mulichi Satvi Mulgi BTS Video

Video : 'सातव्या मुलीची…'मध्ये वेगाने कार चालवते इंद्राणी, पण हे सीन नेमके कसे शूट होतात, व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.