शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

इशा कोप्पीकरने घटस्फोट घेत लेकीसह सोडलं नवऱ्याचं घर, अभिनेत्रीच्या पतीने केलं भाष्य, म्हणाला,”आयुष्यात पुढे जाण्यास…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 8, 2024 | 10:29 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
isha koppikar divorce

इशा कोप्पीकरने घटस्फोट घेत लेकीसह सोडलं नवऱ्याचं घर, अभिनेत्रीच्या पतीने केलं भाष्य, म्हणाला,"आयुष्यात पुढे जाण्यास…"

Isha Koppikar-Timmy Narang Divorce : इशा कोप्पीकर व टिमी नारंग यांचं १४ वर्षांच्या जुन्या नात्याने नवं वळण घेतलं आहे. १४ वर्षांचा संसार मोडून या जोडप्याने अखेरचा घटस्फोट घेतला आहे. याबाबत आता खुद्द टिमी नारंगने या वृत्ताला दुजोरा देत याबाबत भाष्य केलं आहे. घटस्फोटानंतर आता अभिनेत्री इशाने टिमी नारंगचे घर सोडले आहे. त्यांची नऊ वर्षाची मुलगी रियानासह वेगळे राहण्यास ती तयार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टिमी म्हणाला, “जवळपास दीड वर्ष आम्ही घटस्फोटाचा विचार केल्यानंतर त्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी तयार झालो”.

टिमी पुढे म्हणाला, “घटस्फोट गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मंजूर झाला होता आणि तो परस्पर अटींवर होता. आम्ही दोघेही आता आपआपल्या आयुष्यात पुढे जाण्यास मोकळे आहोत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्याबाबत कोणताही संभ्रम नसावा, असे मला वाटत नाही. मी अलीकडील अहवाल वाचले नसले तरी, कायदेशीर पर्यायांचा विचार करणे देखील पर्याय नाही कारण घटस्फोट आधीच झाला आहे”, असंही तो म्हणाला.

आणखी वाचा – Video : लेकीच्या लग्नात उदयपूरच्या पॅलेसमध्ये बेभान होऊन नाचला आमिर खान, पूर्वपत्नीही होती बरोबर, व्हिडीओ तुफान व्हायरल

टीमी नारंग व इशा नारंग यांनी २००९ मध्ये लग्न केले होते. इशा कोप्पीकर व टिमी नारंग यांची पहिली भेट एका जिममध्ये झाली. त्यानंतर ते दोघे प्रेमात पडले. एकमेकांना डेट करण्यापूर्वी इशा व टिमी तीन वर्षे मित्र होते. २००९ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर इशा सिनेसृष्टीपासून दूर गेली आणि तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “लग्न केलं म्हणून तुझा गुलाम नाही”, नवऱ्याकडून अंकिताला लोखंडेला तुच्छ वागणूक, म्हणाला, “आजवर घेतलेला निर्णय…”

इशा कोप्पीकरने अनेक हिंदी तसेच तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुख खानचा चित्रपट ‘डॉन’, विवेक ओबेरॉय स्टारर ‘क्या कूल हैं हम’ आणि ‘कयामत’ या हिंदी चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. आता लवकरच ती तमिळ सायन्स-फिक्शन चित्रपट आयलनमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात शिवकार्तिकेयन, रकुल प्रीत सिंग आणि शरद केळकर हे कलाकारही असणार आहेत.

Tags: entertainmentisha koppikarisha koppikar divorceisha koppikar husbandIsha Koppikar-Timmy Narang Divorce
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Ranbir Kapoor And Alia Bhatt

राममंदिर प्राणप्रतिष्ठापनासाठी रणबीर कपूर व आलिया भट्ट यांना खास आमंत्रण, अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.