Sadhi Manas Serial Off Air : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘साधी माणसं’ या मालिकेने जवळपास २ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘साधी माणसं’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दोघांनी साकारलेली सत्या-मीराची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली. याशिवाय मालिकेत सुप्रिया पाठारे, पंढरीनाथ कांबळे, पंकज खामकर, प्रशांत चौडप्पा, प्रतिभा गायकवाड, मोनिका यांसारखे बरेच कलाकार झळकले आहेत. दरम्यान आता २ वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेचा पहिला भाग मार्च २०२४ मध्ये ऑन एअर झाला होता.
आता ‘साधी माणसं’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकताच मालिकेच्या सेटवर शूटिंगचा शेवटचा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सगळे कलाकार उपस्थित होते. २ वर्षांनी मालिका संपणार हे काळातच मालिकेतील कलाकार देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र अद्याप ‘स्टार प्रवाह’ वाहिनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मालिकेचा शेवटचा भाग २९ मार्चला प्रसारित होईल असं म्हटलं जात आहे. तर लवकरच मालिकेचा अंतिम प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येईल. (Sadhi Manas Serial Off Air)
दरम्यान मालिका निरोप घेणार ही कळताच चाहते देखील नाराज झाले आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर “मालिका संपवू नका” अशा कंमेंट्स देखील केल्या आहेत. दरम्यान ३० मार्च पासून ‘आनंदी’ ही मालिका रात्री ९:३० प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामुळे मालिकेतील इतर मालिकेच्या वेळेत ही बदल करण्यात येतील. तर वाचन दिले तू मला ही मालिका आता ३० मार्च पासून सायंकाळी ६:३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. आणि साधी माणसं ही मालिका निरोप घेणार आहे. (Sadhi Manas Serial Off Air)




