बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सालबर्डी’मधील ‘मंजुळा’ गाण्यात सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाज; ‘अप्सरा’ बनली ‘मंजुळा’

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 26, 2026 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sonali Kulkarni Dance in Salbardi

सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाज

Sonali Kulkarni Dance in Salbardi : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या सालबर्डी या चित्रपटातील ‘मंजुळा’ या गाण्यातून तिचा एक वेगळाच, मनमोहक आणि ऊर्जा भरलेला अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘मंजुळा’ हे आयटम साँग आकर्षक कोरिओग्राफी आणि भन्नाट स्टेप्समुळे आधीच चर्चेत आले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी केली आहे. तर गीतलेखन गुरु ठाकूर यांचे असून संगीत पद्मनाभ गायकवाड यांनी दिले आहे. हे गाणे आनंदी जोशी हिने आपल्या आवाजात सादर केले आहे.

या गाण्याबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, “हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. यात एक वेगळीच एनर्जी आहे. फुलवा खामकर यांनीही यात काहीतरी नवीन आणि एंटरटेनिंग देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना हे नक्कीच आवडेल, असा मला विश्वास आहे.” चित्रपटाच्या निर्मितीबाबत बोलायचे झाल्यास, सालबर्डी हा चित्रपट अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी निर्मित केला आहे. याआधी ‘गुल्हर’, ‘बाबो’ आणि ‘पाणीपुरी’ यांसारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी यावेळी ‘सालबर्डी’च्या माध्यमातून एक मल्टीस्टार रहस्यमय थरारपट प्रेक्षकांसमोर आणला आहे.

आणखी वाचा – २ वर्षांनी ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार निरोप, सेटवर साजरा केला शूटिंगचा शेवटचा दिवस; कलाकारांसह प्रेक्षक ही नाराज

महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या भयावह आणि गूढ घटनांवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा थरार अनुभव देणार आहे. नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारलेल्या या चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर आणि कोमल चौधरी यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. एकंदरीत, आकर्षक कोरिओग्राफी, दमदार संगीत आणि सोनाली कुलकर्णीच्या एनर्जी यामुळे ‘मंजुळा’ हे गाणं प्रेक्षकांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट ठरणार आहे. त्यामुळेच ‘सालबर्डी’ चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

आणखी वाचा – “लाज वाटली पाहिजे, तो माणूस विवाहित आहे”, कुमार सानूबरोबरचे AI फोटो पाहून कुनिका सदानंद भडकली, मानहानीचा केला दावा

Tags: marathi actressmarathi entertainment newsSonali Kulkarni Dance in Salbardi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Tejaswini Pandit Presence In Navaratri Festival

लोअर परळमध्ये ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रोत्सवाला तेजस्विनी पंडित यांची उपस्थिती; भक्तिभावनेने केली सुरुवात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.